रमाकांत नायडू व इंद्रायणी नायडू यांची गरजू विद्यार्थ्यांना मदत



तळेगांव दाभाडे दि. २० (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) प्रगती विद्या मंदिर इंदोरी येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना १०३ बुटांचे  वाटप नायडू परिवाराकडून करण्यात आले या प्रसंगी ईशा नायडू, विश्वास देशपांडे,संजय चव्हाण दिलीप डोळस ,शैलेश गजभिव, संजय जगताप पर्यवेक्षिका कमल ढमढेरे उपस्थित होते. 

शाळेचे प्राचार्य रेवप्पा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता गजभिव यांनी केले. इंद्रायणी नायडू यांनी विद्यार्थ्यांना नेहमी मदत करण्याचे आश्वासन दिले. सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण मखर यांनी आपल्या मनोगतामध्ये नायडू परिवाराने मदत केल्याबद्दल शाळेच्या वतीने धन्यवाद दिले. शाळेच्या ज्येष्ठ अध्यापिका शितल शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी शेलार यांनी केले तर आभारप्रदर्शन पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन स्मिता गजभिव, अदिती कडवईकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश