एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात १२ व्या वार्षिक संशोधन विज्ञानपरिषद संपन्न



 तळेगाव दाभाडे दि. 22 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) येथील माईर एम.आय. टी. पुणेचे  एमआयएमईआर  वैद्यकीय  महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात १२ व्या  वार्षिक संशोधन विज्ञानपरिषदेचे आयोजन गुरुवार दिनांक १९ डिसेंबर व शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. 

या दोन दिवसीय परिषदेचा विषय होता “ मेटॅबॉलिक सिंड्रोम “अ ” ग्लोबल हेल्थ चॅलेंज “  या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते भारताचे प्रमुख नेत्ररोगतज्ञ पदमश्री प्रोफेसर डॉ. सुंदरम नटराजन हे होते. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी एमआयएमईआर वैद्यकीय  महाविद्यालयाच्या  वैद्यकीय कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे आणि डॉ. विरेंद्र घैसास , प्राचार्या  डॉ.  संध्या कुलकर्णी आणि आयोजक अध्यक्ष डॉ. संजीव चिंचोलीकर , डॉ. स्मिता पवार आणि डॉ. वैशाली धाट उपस्थित होते. आपल्या मुख्य भाषणात डॉ. नटराजन यांनी डायबेटिक रेटिनोपॅथी हे जनमाणसांमध्ये अंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे, मधुमेहाच्या रुग्णांनी रेटिना ची तपासणी  नेत्ररोगतज्ञाकडून वेळोवेळी करणे आवश्यक आहे, स्मार्ट फोन आधारित फंडस् कॅमेरामुळे हि तपासणी करणे दुर्गम भागासाठी पण सहज शक्य आहे  असे  प्रतिपादन केले .

 डॉ.सुचित्रा नागरे यांनी परंपरागत आहारशैली आत्मसात करून अनेक आजारांचा प्रतिबंध करू शकतो असे मत व्यक्त केले. तसेच डॉ. नटराजन यांच्या सोबत मावळ विभागातील ग्रामीण जनतेच्या डोळयांचे विकाराचे निदान व उपचार करण्यासाठी भविष्यात काम करण्याची  ईच्छा दर्शवली .  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा शर्मा  यांनी केले.   

या परिषदेत विविध सत्रांमध्ये नामवंत वक्ते उपस्थित होते. सुप्रसिध्द एंडोक्रायनॉलॉजिस्ट  व चेलाराम हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. ए. जे. उन्निकृष्णन यांनी मेटाबॉलिक सिंड्रोम साठी लठ्ठपणा कसा कारणीभूत आहे याचे प्रतिपादन केले. डॉ. रित्तु चंडेल ब्रीच कॅंडी हॉस्पिटल  च्या  क्लिनिकल बायोकेमिस्ट यांनी या सिंड्रोम मध्ये रक्तामधील विविध घटकांची  विसंगती  याबद्दल भाष्य केले. 

 या विज्ञान परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. राजेश धोपेश्वरकर यांनी उत्तम आरोग्यासाठी झोपेचे महत्त्व  या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आहारतज्ञ डॉ. गीता धरमट्टी यांनी आहार विषयी माहिती देत ताजे अन्न, फळे आणि भाज्या  यांचे महत्व सांगितले.  

तसेच या विज्ञान परिषदेत “डिकोडिंग  मेटाबॉलिक सिंड्रोम” या विषयावर चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये सुप्रसिध्द  एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉ. मोहन मगदुम, मधुमेह तज्ञ  डॉ. चंदकांत कणसे आणि  विकृती शास्त्र  तज्ञ डॉ. मनीषा पटवर्धन यांनी सहभाग घेतला  होता . या  चर्चासत्राचे सूत्रसंचालन वैद्यकशास्त्र  विभाग प्रमुख डॉ. प्रीती दवे यांनी केले.   



डॉक्टर्स, पदव्युत्तर विध्यार्थी आणि एमबीबीएस विध्यार्थी यांनी या वैद्यकीय  संशोधन कार्यशाळेमध्ये जवळपास १०० वैज्ञानिक पेपर आणि पोस्टर चे सादरीकरण केले.

विविध श्रेणीतील सर्वाकृष्ट  पेपर व पोस्टर यांना पारितोषिक देण्यात आली. या परिषदेत जवळपास ४००  डॉक्टरांनी सहभाग घेतला होता .

डॉ. संध्या कुलकर्णी , प्राचार्या एमआयएमईआर  वैद्यकीय महाविद्यालय यांनी समारोपाचे भाषण केले आणि सर्व वक्ते व पॅनल चे आभार मानले .  

जीवरसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली वैशाली धाट ,सहयोगी प्राध्यापक  डॉ. अपर्णा चौधरी, नेत्ररोग विभाग प्रमुख  डॉ. स्मिता पवार जन  औषध विभाग प्रमुख  डॉ. संजीव चिंचोलीकर , डॉ. आस्था   पांडे, डॉ. मधुरा अष्टुरकर यांनी १२ व्या वार्षिक संशोधन विज्ञान परिषदेचे उत्तमरित्या आयोजन केले त्याबद्दल संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ. तुषार खाचणे, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, कार्यकारी संचालक  डॉ. विरेंद्र  घैसास व डॉ. सुचित्रा नागरे यांनी सर्वांचे कौतूक केले.

 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ. संदीप गाडेकर 

संपादक 

मोबाईल - 820 818 50 37



Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश