मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला २६ ते २८ डिसेंबर रोजी

 

तळेगाव दाभाडे दि. २१ (संपादक डॉ. संदीप गाडेकर) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे यावर्षी देखील आयोजन केलेले आहे. मा. कृष्णराव भेगडे हे मावळ परिसराच्या सार्वजनिक जीवनातील एक सहिष्णू व्यक्तिमत्व ! त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून सर्वाच्या मनात एक आगळीवेगळी मुद्रा उमटवली आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यप्रेरणेचा विचार विद्यार्थी, पालक आणि समाजापर्यंत पोहचविण्याच्या उदात्त हेतूने 'मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला' आयोजित करीत आहोत.

दि.२६ डिसेंबर २०२४ ते दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सदर व्याख्यानमाला इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

 उद्घाटनाचे पुष्प दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी पद्‌द्मभूषण मा. सुमित्राताई महाजन, मा. सभापती, लोकसभा, भारत सरकार यांच्या भाषणाने गुंफले जाणार असून 'भारतीय ज्ञान परंपरा' या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. भारताला लाभलेल्या समृदध ज्ञान परंपरा आज सगळया जगाला दिशादर्शक ठरतील अशा आहेत. या ज्ञान परंपरा, वारसा आजच्या पिढीने जतन करुन ठेवला पाहिजे. या पहिल्या पुष्पाचे अध्यक्षस्थान इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदासजी काकडे भूषविणार आहेत.



दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे 'बाप समजून घेताना' या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. त्यांच्या या व्याख्यानामधून आई आणि बाप यांचे

संवेदनशील नाते उलगडले जाणार आहे. या व्याख्यानासाठी मावळ तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या दुसन्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे उपस्थित राहणार आहेत.



दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी समारोपाचे पुष्प ज्येष्ठ संपादक श्री. संजय आवटे, दै. लोकमत, यांच्या व्याख्यानाने संपन्न होईल. त्यांच्या व्याख्यानाचा विषय 'चला उभारू नवी पिढी' हा आहे. भारताची सुसंस्कृत, राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान निर्माण करणारी नवी पिढी घडविण्यासाठी त्यांचे मौलिक विचार दिशादर्शक ठरणार आहे. या समारोपाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी श्री. दिलीप बंड (आय.ए.एस., माजी विभागीय आयुक्त) हे उपस्थित राहणार आहेत.

व्याख्यानमालेचे यंदाचे १० वे वर्ष असून या व्याख्यानमालेचा मावळ तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, पालक तसेच नागरिक बंधू-भगिनी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदासजी काकडे, सचिव श्री. चंद्रकांत शेटे आणि संस्था पदाधिकारी, व्यााख्यानमालेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व खजिनदार श्री. शैलेश शहा आणि इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व संयोजक डॉ. संभाजी मलघे यांनी केले आहे.

विशेष पुरस्कार
कार्यक्रमात इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रात योगदानासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांना, सांप्रदायिक क्षेत्रासाठीच्या भरीव योगदानासाठी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांना, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल ऑलिम्पिक पटू मारुती आडकर यांना, पर्यावरण संवर्धनात केलेल्या कार्याबद्दल अलोक काळे, तर पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार पं. सुरेश साखवळकर यांना गौरविण्यात येणार आहे.


बातमी व जाहिराती साठी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037




Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश