समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत १४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

 


तळेगाव दाभाडे दि. २१ (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) मावळमधील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने माध्यमिक स्तरावर समर्थ शलाका शिष्यवृत्ती (Samarth Shalaka Scholarship) परीक्षा गुरुवारी (दि१९) घेण्यात आली असून ती सुरळीत पार पडली.

मावळ तालुक्यातील संस्थेच्या विविध शाळां मधील सुमारे १ हजार ४०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.  माजी आमदार कृष्णराव भेगडे आणि संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ही समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली.



संस्थेच्या प्राथमिक सात, माध्यमिक सहा, उच्च माध्यमिक पाच शाळांमधील इयत्ता ४थी,इयत्ता ७वी, इयत्ता ९वी, इयत्ता ११वी मधील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी सहभागी झाले होते. ॲड शलाका संतोष खाडगे चॅरिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांंच्या संयुक्त विद्यमानाने ही परीक्षा घेण्यात आली.

केंद्रस्तरावरील यूपीएससी व राज्यस्तरीय एमपीएससी स्पर्धा परीक्षा पद्धतीनुसार ही परीक्षा घेतली गेली.ही पुर्व परीक्षा असून फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मुख्य परीक्षा घेऊन शिष्यवृतीसाठी  विद्यार्थांंची निवड करण्यात येणार आहे.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के,सहसचिव नंदकुमार शेलार,परीक्षा सह प्रकल्पप्रमुख सोनबा गोपाळे, संस्थेचे जेष्ठ संचालक दामोदर शिंदे, महेशभाई शहा,यादवेंद्र खळदे, विनायक अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापक वासंती काळोखे,पांडुरंग पोटे,रेवाप्पा शितोळे,भाऊसाहेब आगळमे, कैलास पारधी,संजय वंजारे, अनिता लादे यांच्याकडून या परीक्षेचे नियोजन केले गेले होते.

बातमी आणि जाहिरात संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185837

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश