पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी राजेश गायकवाड

तळेगाव दाभाडे दि. 30 (प्रतिनिधी) पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी वरसुबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश मारुती गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. विश्वस्त अरुण थोरात, शिवाजी किलकिले, हनुमंत कुबडे, संघाचे मावळते अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, आदिनाथ थोरात, हरिश्चंद्र गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. गायकवाड हे गेली ३० वर्ष मुख्याध्यापक पदी कार्यरत असूनस संघटनेत अनेक पदावर ते कार्य करत आहेत. मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे सात वर्ष तालुकाध्यक्ष पद भूषवले आहे. तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे तीन वर्षे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम पाहिले आहे. शाळांना भौतिक सुविधा साठी मदत करणे, शाळांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन स्तरावर मदत करणे. अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. त्यांच्या या ...