तळेगाव येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न श्री स्वामी समर्थांच्या पालखी दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर

तळेगाव दाभाडे दि.31 (प्रतिनिधी) स्टेशन भागात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जयंती उत्सव सोहळा माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे मार्गदर्शना नुसार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री सप्तशृंगी माता मंदिरात श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन,श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे वाचन व हवन, आरती व महाप्रसाद आदी धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच श्री सप्तशृंगी माता मंदिरा पासून इंद्रायणी वसाहत, आनंद नगर, वनश्री नगर, मनोहर नगर, श्री स्वामी समर्थ मंदिर, सिम्को कॉलनी, मोहन नगर परत सप्तशृंगी माता मंदिर असा पालखी मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.पालखी मार्गावर अनेक भाविकांनी दर्शनाचा आणि पालखी खांद्यावर घेवून सारथ्य करण्याचा लाभ घेतला पालखी बरोबर चालण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यामध्ये महिला भाविकांचाही सहभाग लक्षणीय होता. पालखी समोर आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात येत होता. पालखी मार्ग आकर्षक रांगोळी काढून सुशोभित केला होता. जागोजागी पालखीचे पूजन आणि स्वागत करण्या...