स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने स्वा. सावरकर पुण्यतिथी साजरी

तळेगाव दाभाडे दि. २८ (प्रतिनिधी) तळेगाव येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त मावळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी इ. ५ वी ते ७ वी साठी "क्रांतीकारक सावरकर", इ. ८ वी ते १० वी साठी "विज्ञाननिष्ठ सावरकर / समाजसुधारक सावरकर", तर खुल्या गटासाठी "हिंदुत्व व सावरकर" या विषयांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण सोहळा व स्वा. सावरकर यांच्या कार्यावर व्याख्यान कडोलकर कॉलनी येथील स्वा. सावरकर गुरुकुल येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सभापती अशोक काळोखे होते, तर मुख्य वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे उपस्थित होते. यावेळी बोलताना पुरंदरे म्हणाले, "सावरकर हे थोर क्रांतीकारक आणि समाजसुधारक होते. इंग्रजांनी चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर अवघ्या १३-१४ व्या वर्षी सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी मातृभूमीच्या सेवेसाठी संघर्ष केला." अशो...