ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे ईश्वरीय रक्षाबंधन संपन्न

नांदेड दि. ८ (प्रतिनिधी)नांदेड फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास ब्रह्माकुमारीज वसंत नगर येथील वरिष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी,बि.के.अनिता दिदी,बि.के.सत्या दिदी व योगिनी दिदी यांची उपस्थिती होती. बि.के.अनिता दिदि यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर स्वाती दिदि यांनी रक्षाबंधन या भाऊ बहीनीच्या पवित्र उत्सवा प्रसंगी हेल्थ अँड वेल्थ चा आणि अध्यात्मिक कोर्स करण्याचा संकल्प परमात्मा कडे करु या असे प्रतिपादन दिदिनी केले. सर्व भाऊ बहिणीना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देऊन परमात्मा संदेश चे वाचन करण्यात आले. नंतर सर्वांना ईश्वरीय राखी बांधण्यात आली.कार्यक्रमास फरांदे पार्क व परिसरातील बि.के परिवार मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम आध्यात्मीक उत्साहात साजरा झाला. डॉ.संदीप गाडेकर संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay