Posts

राजवर्धन वाडा यांच्या वतीने शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आखाडा मेजवानी

Image
  फोटो : सोमाटणे येथील राजवर्धन वाडा येथे शारदाश्रामातील विद्यार्थ्यांना आखाडा मेजवानी देण्यात आली. शिरगाव : दि.२३ (प्रतिनिधी) लहान मुले ही देवा घरची फुले… मुलांची सेवा ही ईश्वर सेवा या उक्तीची कास धरून व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दत्तात्रय राक्षे यांच्या वतीने सोमाटणे येथील राजवर्धन वाडा येथे शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेतील निवासी  विद्यार्थ्यांसाठी खास आखाडा मेजवानीचे आयोजन करण्यात आले.  आश्रमातील  १३० विद्यार्थ्यांनी या मेजवानीचा आस्वाद घेतला व राजवाडा पद्धतीने निर्माण केलेल्या वाड्यामध्ये बसून जेवणाचा आनंद लुटला. या निमित्ताने क्षेत्रभेट घडवून आणली. राजवाड्यात ठेवण्यात आलेल्या पुरातन कालीन वस्तू, भांडी आदींची विद्यार्थ्यांनी पाहणी केली. गप्पा गोष्टी करत विद्यार्थ्यांनी गाणी गायली. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विजय लोखंडे व रमेश फरताडे यांच्या हस्ते राजवर्धन वाडाचे मालक दत्तात्रय राक्षे यांचा सत्कार करण्यात आला.   यावेळी राजवर्धन वाडाचे मालक दत्तात्रय राक्षे, अक्षय मुऱ्हे, निखील गराडे, सानिका राक्षे, सार्थक राक्ष...

इंद्रायणी महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला

Image
तळेगाव दाभाडे दि. 23 (प्रतिनिधी) नुकताच जगभर 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन दिन(World youth skills day)  म्हणून साजरा करण्यात आला. जागतिक स्तरांवर देशाची ताकद वाढवायची असेल तर युवकांमध्ये कौशल्य असणे फारच गरजेचे आहे... पदवी बरोबर कौशल्य व कौशल्या बरोबर आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाबरोबर राष्ट्रनिर्मितीचा दृष्टिकोन असल्यास आपला भारत देश नक्कीच रोजगाराभिमुख कौशल्य प्रधान देश होईल यात शंका नाही.  15 जुलै या दिवसाचे औचित्य साधून इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे तंत्र शिक्षण विभागा तर्फे विज्ञान विभागातील व तंत्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यां साठी एक दिवसीय एलईडी मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   एलईडी तयार करण्याचे ट्रेनिंग तंत्रशिक्षण विभागातील माजी विद्यार्थी श्री. सुरज सिद्ध गवळी यांनी दिले.या कार्यक्रमासाठी इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस पी भोसले सर तंत्र शिक्षण विभाग प्रमुख श्री. एन टी भोसले सर, विज्ञान विभाग प्रमुख श्री. खाडप सर, श्री. गोरख काकडे सर, प्रा. कावेरी मॅडम,  श्री.भुजबळ सर तसेच विज्ञान विभागातील शिक्षक ...

जगातील पहिले हायब्रीड एंडोस्कोपिक-मायक्रोस्कोपिक ENT स्किल लॅब डीवाय पाटील मेडिकल कॉलेज, पुणे येथे उद्घाटन

Image
  जगातील पहिले हायब्रीड एंडोस्कोपिक - मायक्रोस्कोपिक ENT स्किल लॅब डीवाय पाटील मेडिकल कॉलेज , पुणे येथे उद्घाटन US- पेटंटेड EndoHold प्रणालीसह भारत ENT प्रशिक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व करत आहे.    पुणे , दि. २३   जुलै   २०२५  (प्रतिनिधी) – ENT शस्त्रक्रिया शिक्षणाच्या इतिहासात एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला , जेव्हा डॉ . डी . वाय . पाटील मेडिकल कॉलेज , हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर , पिंपरी येथे जगातील पहिले हायब्रीड एंडोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक ENT स्किल लॅब – एंडोप्ले स्किल लॅब – याचे उद्घाटन करण्यात आले . या लॅबमध्ये US- पेटंटेड EndoHold प्रणाली वापरून दोन हातांनी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया प्रशिक्षण दिले जाते . या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात पहिल्या हायब्रीड टेंपोरल बोन डिसेक्शन वर्कशॉपने झाली , ज्यात देशभरातील २० निवडक ENT सर्जन्स आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .      ही अभिनव संकल्पना डॉ . पी . डी . पाटील ( कुलपती ), डॉ . भाग्यश्री पाटील ( प्र...

विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार - डॉ. व्ही. बी.गायकवाड

Image
  पुणे दि. 20 (प्रतिनिधी) ज्ञानगंगा घरोघरी या उद्देशाने प्रेरित झालेल्या विचारसरणीला पुढे घेऊन जाण्याकरिता विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी सेवा विभाग आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.       खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये पुणे विभागीय केंद्र तर्फे आज आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये १५० कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग नोंदविला. पुणे विभागीय संचालक असलेले श्री. गायकवाड पुढे म्हणाले विद्यार्थ्यांच्या समोर एकच पर्याय न ठेवता बहुपर्यायी भवितव्याच्या वाटा त्यांना मोकळ्या करून देणे हे कार्य मुक्त विद्यापीठांतर्गत केले जात आहे.  याप्रसंगी  उपस्थित डावीकडून एम के सी एल चे डॉ. अविनाश देशमुख महाविद्यालयाच्या केंद्र संयोजक प्रा. मेहनाज कौसर , प्रा. श्वेता कापडी, व्ही. बी. गायकवाड, डॉ. संजय चाकणे, डॉ. प्रकाश देशमुख, अक्षय  गामणे यशवंतराव  चव्हाण आणि पुणे विभागीय केंद्राचे सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.     आपल्या मार्गदर्शनपर भाषणाम...