Posts

रत्नदुर्ग सहकारी गृहरचना संस्थेत "जागर सुवासिनीचा ..खेळ मंगळागौरीचा " संपन्न

Image
  पुणे दि.२५ (प्रतिनिधी) रत्नदुर्ग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सेक्टर-12 ,प्राधिकरण ,भोसरी, पुणे-26  आयोजित "जागर सुवासिनीचा ..खेळ मंगळागौरीचा " कार्यक्रम पावसाची संततधार चालू असल्याने रद्द करावा लागला होता. या कार्यक्रमाला सजना चित्रपटाची अभिनेत्री तृप्ती मोरे उपस्थित राहणार होती, त्यामुळे महिला वर्ग अतिशय जोशात होता परंतु पावसाने काहीसा हिरमोड केला. महिलांनी कार्यक्रमासाठी बरेच दिवस तयारी केली होती त्यामुळे रविवार दि. 24/08/2025 रोजी पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने  कमी वेळात आयोजित केला. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.     कार्यक्रमाला महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका तृप्ती शिर्के हिची प्रमुख उपस्थिती लाभली . सर्व सहभागी महिलांना सूर्या इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून 500 रु चे गिफ्ट व्हावचर  तृप्ती शिर्के हिच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार मा.कैलास भुजबळ, धनाजी पाटील आणि अनिकेत उत्पात यांचं मोलाचं सहकार्य लाभले.        संस्थेच्या वतीनं स्नेहा इंद्राळे यांनी शा...

गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी वैज्ञानिक लिखाण महत्त्वाचे - डॉ. संभाजी मलघे

Image
तळेगाव दाभाडे दि. २३ (प्रतिनिधी) :- वैज्ञानिक लिखाणाची योग्य जडणघडण ही गुणवत्ता पूर्ण संशोधनाची पहिली पायरी असून वैज्ञानिक लेखन हे केवळ संशोधनाचे परिणाम नोंदविण्याचे साधन नसून वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभाग व माय रेंज पब्लिकेशन सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक लेखन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मलघे बोलत होते. याप्रसंगी विविध विषयांचे विभाग प्रमुख, विज्ञान विभाग प्रमुख डॉ.रोहित नागलगाव , सर्व विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व अध्यक्ष रामदास काकडे यांनी शुभेच्छा व प्रेरणा दिली. पुढे बोलताना डॉ. मलघे म्हणाले की, मानवी जगण्याला शास्त्रीय आधार प्राप्त करून देणाऱ्या विज्ञान शाखेचा विस्तार हा व्यापक स्वरूपाचा आहे. बदलत्या शैक्षणिक आणि जागतिक संदर्भांमध्य...

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनी "हृदय उपचार केंद्र" चे उदघाटन

Image
तळेगाव दाभाडे दि.२२ (प्रतिनिधी ) माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय व रुबी एलकेअर यांचे सहकार्याने नवीन  "हृदय उपचार केंद्र" सुरु करण्यात आले आहे. संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनी या  केंद्राचे उदघाटन मावळचे विद्यमान आमदार मा. श्री. सुनील अण्णा शेळके यांचे हस्ते दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ  डॉ. राजेश धोपेश्वरकर उपस्थित होते.  मावळ भागातील गरजू रुग्णांना या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा हृदय उपचार केंद्रामध्ये अत्यंत माफक दरामध्ये रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, वाल्व्ह रिप्लेसमेंट इत्यादी हृदय रोगांवर उपचार करण्यात येणार आहेत.  मावळ भागातील जनतेला देत असलेल्या उत्तम आरोग्य सेवेबाबत तसेच मावळ भागामध्ये आरोग्यविषयक विविध उपक्रमांमध्ये संस्था त्यांना करत असलेल्या सहकार्याबद्दल आमदार मा. श्री. सुनील अण्णा शेळके यांनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका  डॉ. सुचित्रा नागरे यांचे  आभार मानले व संस्थेचे कौतुक केले. तसे...

HDFC परिवर्तन व अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन याच्यासयुक्त विद्यमानाने म्हाळसकांत विद्यालयामध्ये विज्ञान केंद्राचे उद्घाटन

Image
  पुणे, दि. २२ (प्रतिनिधी) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री म्हाळसकांत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आकुर्डी येथे, विज्ञान केंद्र व इंटिग्रेटेड मोबाईल लॅबचे उदघाटन झाले. हे विज्ञान केंद्र एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या आर्थिक सहाय्याने व अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या वतीने स्थापन करण्यात आले आहे.  विज्ञान केंद्राबरोबरच इंटिग्रेटेड सायन्स लॅब व मोबाईल इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन , आयुक्त डिपार्टमेंट ऑफ सोशिअल जस्टीस अँड इंपॉवरमेन्ट च्या श्रीमती दिपा मुधोळ-मुंडें , तसेच मा. अमोल बिटकर झोनल हेड HDFC बँक व  कुलदीप छाजेड झोनल हेड HDFC बँक पुणे , पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रशासन श्री ए.एम जाधव  यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतिश राव (शास्त्रज्ञ व अभियंता,इस्रो ) ,तसेच सीएसआर एचडीएफसी बँक परिवर्तनचे वरिष्ठ व्यवस्थापक योगेश पगारे, अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन जनरल मॅनेजर विक्रांत सोळंकी, राज्य प्रमुख रमेश हितनल्ली, , श्री म्हाळसकांत प्राचार्य श्री . मालुसरे बी .डी. सर, उपप्राचार्य श्रीमती पठारे मॅडम ,तसेच प्रकल्प विभाग प्रमुख  सुधीर स...

पांडुरंग रामभाऊ पोटे राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार २०२५ ने सन्मानित

Image
तळेगाव दाभाडे दि. २२ (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे येथील पांडुरंग रामभाऊ पोटे यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन शाखा कोल्हापूर पुणे यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील करत असलेल्या कार्याची दखल घेऊन दिनांक १७ ऑगस्ट २०२५  रोजी पुणे येथे मौलान अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अतिरिक्त महासंचालक यशदा पुणे श्री. शेखर गायकवाड साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे पाटील, प्रा. प्रकाश कोळी तसेच मास्टर ट्रेनर यशदा पुणे विवेक गुरव सर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष संजय पवार जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रकाश चौधरी पुणे व सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. प्रकाश चौधरी यांनी केले त्यांनी कार्यक्रमाची उद्देश आणि हेतू सांगून विविध क्षेत्रात काम करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अविष्कार फाउंडेशनचे काम खूप चांगल्या प्रक...

इंद्रायणी महाविद्यालयात ‘अर्थम वर्धिनी’ इकॉनॉमिक्स क्लबचे उद्घाटन

Image
  तळेगाव दाभाडे, दि. २१ (प्रतिनिधी) इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील अर्थशास्त्र विभागामार्फत “21 व्या शतकातील भारतापुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रो. डॉ. श्रुती तांबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान अर्थशास्त्र विभागाचा “अर्थम वर्धिनी” हा इकॉनॉमिक्स क्लब स्थापन करण्यात आला. उद्घाटन प्रमुख पाहुण्या डॉ. तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी या क्लबच्या निमित्ताने तयार केलेली विविध अर्थशास्त्रीय मॉडेल्स आणि पोस्टर्स प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती. डॉ. तांबे यांनी सर्व मॉडेल्स व पोस्टर्सची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व्याख्यान सत्रात बोलताना डॉ. तांबे म्हणाल्या, “भारतीय युवा पिढीकडे प्रचंड क्षमता आहे. मात्र ती योग्य दिशेने वळवण्यासाठी क्षमता, कौशल्य, दूरदृष्टी, योजना आणि अंमलबजावणी या पंचसूत्री अंगीकारणं अत्यावश्यक आहे. 21 व्या शतकात भारतासमोर असणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी ही पंचसूत्रीच तरुणाईला मार्गदर्शक ठरेल.” ...

सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन तर्फे गणेश काकडे व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन च्या वतीने भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

Image
  तळेगाव दाभाडे दि.28 (प्रतिनिधी) सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन तर्फे गणेश काकडे व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन च्या वतीने भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील माता भगिनींकरिता आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे यांनी गणेश काकडे हे नेहमी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात. त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे परिसरातील महिला दरवर्षी अतिशय उत्साहाने आपल्या घरी येणाऱ्या गौरायांची आरास करीत असतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले.  स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. तसेच या स्पर्धेत भरघोस बक्षिसांची लयलूट होणार आहे. बक्षीस वितरणास उपस्थित महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ विशेष प्राविण्य महापैठणी प्रथम क्रमांक मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ, तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला व उत्तेजनार्थ तीन बक्षीसे सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू दिले जाणार आहेत. स्पर्धेचे...

व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन

Image
 लोणावळा दि. २१ (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे या वर्षीही व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये Q Spider या  कंपनीने सहभाग घेतला. विविध शाखांतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच संवाद कौशल्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये ऑनलाईन टेस्ट, तांत्रिक मुलाखत व एच.आर. मुलाखतींचा समावेश होता. या प्रक्रियेतून प्रथमेश दिघे, हर्ष येवले,विकास बहिरे, प्रतिक बेरड व ऋतुजा राहिंज या विद्यार्थ्यांची Q Spider मध्ये निवड झाली.  त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. भगवान आंबेकर, ॲड. संदीप अगरवाल, श्री. नितीन गरवारे, श्री. स्वप्नील गवळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर आणि सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसुरकर, प्रा...

अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे ग्रंथालय दिन उत्साहात साजरा

Image
  वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे 12 ऑगस्ट 2025 रोजी श्री. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथालय दिन म्हणून साजरा करण्यात आला. ग्रंथालय शास्त्राचे जनक श्री. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळावा म्हणून खूप मोठे योगदान दिले  म्हणून  त्यांची जयंती ग्रंथालय दिन म्हणून साजरी केली जाते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. जाधव सुजाता यांनी केले. श्री. एस. आर. रंगनाथन यांची संपूर्ण माहिती प्रा. सुप्रिया पाटोळे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी रामकृष्ण मोरे कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. विक्रांत शेळके यांनी ग्रंथ ग्रंथालयाचे वाचन व महत्व  याबद्दल व्याख्यान दिले.  या कार्यक्रमास कला वाणिज्य महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रा.अशोक गायकवाड,  अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता धायगुडे प्रा. सांगळे महादेव, प्रा. डॉ. तोटे कविता, प्रा. डॉ. देवळाकर शीतल, प्रा. रणदिवे प्रा. डॉ.संदीप गाडेकर, प्रा. पाटील सोनाली, प्रा. शबाना मोकाशी, प्रा....

सेक्टर 12 मध्ये रत्नदुर्ग सोसायटी मध्ये महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन

Image
पुणे दि.18 (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उद्या मंगळवार दि 19/08/2025 रोजी सेक्टर 12 मध्ये रत्नदुर्ग  सोसायटी मध्ये महिलांसाठी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.     या कार्यक्रमाला सेलिब्रिटी गेस्ट सजना चित्रपटाची अभिनेत्री तृप्ती मोरे अभिनेता आकाश सर्वगोड उपस्थित राहणार आहे त्याच प्रमाणे सण उत्सव आणि आजची स्त्री यावर प्रसिद्ध व्याख्याती अश्विनी कुडेकर हीचे व्याख्यान होणार आहे या सम्पूर्ण कार्यक्रमाच सूत्रसंचालन निवेदिका अश्विनी दिघे या करणार आहे.   हा आगळावेगळा आणि देखणा कार्यक्रम सेक्टर 12 मध्ये रत्नदुर्ग सोसायटीने आयोजित करून स्त्री शक्तीला व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष  बाबाजी कळमकर, कैलास भुजबळ ,राजेंद्र घाडगे ,सचिन ढेरंगे, गणेश जाधव ,श्रावण गुंजाळ, धनाजी पाटील अनिकेत उत्पात आणि अमर जोशी यांनी सर्वानी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk...