माजी विद्यार्थी पंडित श्री. विदुर महाजन यांच्या सुश्राव्य सतार वादनाचा १५० वा कार्यक्रम संपन्न

 माजी विद्यार्थी पंडित श्री. विदुर महाजन यांच्या सुश्राव्य सतार वादनाचा १५० वा कार्यक्रम संपन्न 


नूतन महाराष्ट्र च्या अमृत महोत्सव निमित्ताने आयोजन




तळेगांव स्टेशन (संपादक- डॉ. संदीप गाडेकर) दि.२४ डिसेंबर 2022 रोजी शाळेचे माजी विद्यार्थी पंडित श्री. विदुर महाजन यांच्या सुश्राव्य सतार वादनाचा १५० वा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार शेलार साहेब, संगीत प्रेमी श्री. विश्वास देशपांडे, सौ. अपर्णा महाजन, श्री कोनकर काका, पंडितजींचे नातेवाईक, शिष्य व संगीत क्षेत्रातील जाणकार मंडळी उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीणा धारिणी विद्येची देवता सरस्वती चे पूजन करण्यात आले.


पंडित विदुर महाजन यांनी राग संगीत विद्यार्थ्यांना समजावा, सतार हे भारतीय वाद्य विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावे ,शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून 150 वा कार्यक्रम शाळेत व्हावा या हेतूने कार्यक्रमाचे नियोजन शाळेमध्ये केले होते. सांस्कृतिक केंद्र असणारी तळेगाव नगरी आणि पूर्वीची नूतन विद्यामंदिर आत्ताची ॲड. पु.वा.परांजपे विद्यामंदिराशी असणारं भावनिक नातं विद्यार्थ्यांना सांगितलं. १३ जिल्ह्यामधून सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना व पंचवीस हजार ग्रामस्थांना त्यांनी आपल्या सतार वादनातून मंत्रमुग्ध केले आहे यासाठी त्यांनी दहा हजार किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत केला आहे पंडित विदुर महाजन यांनी त्यांच्या वादन साधनेचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला* त्यांच्या समवेत त्यांच्या शिष्या योगिता व वेदांशी या गुरु शिष्यांनी मिळून सतार वादनातून शाळेचा संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे औषधी गुणांनी युक्त असणारी तुळस देऊन सत्कार करण्यात आले. तसेच पंडितजीं समवेतआलेले त्यांचे नातेवाईक शिष्य यांनी देखील पंडितजींचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. पंडितजींनी आपली शिष्या योगिता हिला सतार ठेवण्यासाठी फायबर कव्हर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पंडित विदुर महाजन यांचा परिचय विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे यांनी करून दिला संस्थेचे सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष आदरणीय नंदकुमार शेलार साहेब यांनी आभार प्रदर्शनात पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध उद्योजक, संगीत क्षेत्रातील  दिग्गज आहेत तसेच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि अमृत महोत्सवी वर्षांमध्ये त्यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम शाळेमध्ये घेता आला हे आम्हा सर्वांचे भाग्यच समजतो संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक श्री पांडुरंग कापरे सर व संपूर्ण शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील अध्यापिका सौ आरती पोलावार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश