विद्यार्थांचा सर्वांगीण विकास जोपासणारी शाळा -सचिव श्री.पोपटशेठ बाफना

 विद्यार्थांचा सर्वांगीण विकास जोपासणारी शाळा -सचिव श्री.पोपटशेठ बाफना.



तळेगाव स्टेशन ( संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि.१७ श्री.भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर मुख्याध्यापक श्री.कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली.
दिनांक 3/4 जानेवारी. रोजी विद्यालयात क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
कबड्डी,खो - खो,धावणे,उंच उडी, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला.विद्यार्थांनी विविध खेळातील कौशल्य दाखवले.त्यामुळे संस्थेचे सचिव श्री.पोपटशेठ बाफना यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.


स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बऊर ग्रामपंचायत संरपंच .श्री.प्रविण भवार,मा.संरपंच श्री.संदिप खिरीड, ग्रामपंचायत सदस्य श्री.शंकर शिंदे, ग्रामस्थ संजय ठोंबरे,भाऊ म्हस्के, संतोष आढाळगे मान्यवर उपस्थित होते.



मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे कार्यक्षम मुख्याध्यापक श्री.कदम सर यांनी केले.
स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये पंच म्हणून श्री.माने सर  श्री. शिंदे सर व श्री. खोसे सर श्री.सुनिल तिकोणे  यांनी काम पाहीले.
तसेच टाईम मास्टर म्हणून श्री.संदीप वाकडे यांनी काम पाहीले.तसेच गुणलेखण म्हणून श्री.प्रविण भगवान भवार यांनी काम पाहीले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश