एमआयटी बी.एड्. महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल

एमआयटी बी.एड्. महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल


आळंदी (प्रतिनिधी ) दि २९ सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या जून 2023 मध्ये घेतलेल्या शिक्षणशास्त्र  पदवी (बी.एड्. )परीक्षेत आळंदी येथील माईर्स ,एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी. एड्.महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला . महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुवर्णा म्हस्के (८२.९० टक्के )यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी दिली . 

दोन ते पाच क्रमांक मिळवणारे अनुक्रमे विद्यार्थी ,शितल शेंडे ( ८२.७५%), राजेश्वर पाखरे ( ८२.५०%), प्रणाली सोनवणे ( ८१.९० %), प्रियांका भावे ( ८१.२५ %)

प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, डॉ. प्रतिभा दाभाडे, प्रा. अंगद जावळे, डॉ. गंगोत्री रोकडे, डॉ. विकास तुपसुंदर , डॉ. शिल्पा गावंडे , प्रा. संजय शिंदे,  प्रा. दर्शना पवार , प्रा. शेखर क्षीरसागर , प्रा. दिशा ठाकूर , प्रा. संदीप गाडीलकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले . संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . महाविद्यालयाच्या वतीने बी.एड्. हा अभ्यासक्रम अत्यंत आधुनिक पद्धतीने  राबविण्यात येतो यामध्ये तंत्रज्ञानावर आधारीत पाठ, ४.० मधील नावीन्यपूर्ण उपक्रम, परदेशी शिक्षणाची संधी, आंतरराष्ट्रीय परिषदा, भारतीय संस्कृती व मूल्य शिक्षण याचबरोबर नोकरीची हमी देण्यात येते. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष 2023 -24 साठीचे प्रवेश पूर्ण झाले असल्याबद्दलची माहिती प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा

विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार - डॉ. व्ही. बी.गायकवाड