माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभासद वाढ अभियानास भरघोस प्रतिसाद

माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभासद वाढ अभियानास  भरघोस प्रतिसाद 

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा 2023 बारामती येथे आयोजित करण्यात आला होता . या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या पुणे माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभासद वाढीच्या अनुषंगाने  स्टॉल लावण्यात आलेला होता. या स्टॉलला जवळपास 13 तालुक्यातील 500 च्या वर शिक्षकांनी भेट दिली व सभासदत्व स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली. यावेळी पतपेढीचे अध्यक्ष विजयराव कचरे सर,उपाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे सर, राज मुजावर,दत्तात्रेय हेगडकर, प्रा.शशिकांत शिंदे प्रा.संतोष थोरात, सचिन दुर्गाडे, डॉ.संदीप गाडेकर संचालिका सौ.हर्षा पिसाळ, पतपेढीचे व्यवस्थापक संदीप सुतार,तसेच ज्ञानेश्वर कानवडे,अलोक कंक या सर्वांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींना अतिशय छान माहिती देऊन आपल्या पतपेढीच्या कार्याची ओळख करून दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य टीडीएफ चे कार्याध्यक्ष जी. के. थोरात सर,विश्वस्त के.एस. ढोमसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.वसंतराव ताकवले,कार्यवाह पंकज घोलप, राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे   टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे, महीला अध्यक्षा स्वातीताई उपार, स्नेहलता बाळसराफ या सर्वांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पतसंस्थेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने,सभासद वाढीसाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अधिक माहितीसाठी  संपर्क 

मा.संदिप सुतार (व्यवस्थापक)

9822350951

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश