प्रा. संतोष थोरात व डॉ.संदीप गाडेकर लिखित पोएट्री अँड फिगर्स ऑफ स्पीच या इंग्रजीच्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

 प्रा. संतोष थोरात व डॉ.संदीप गाडेकर लिखित पोएट्री अँड फिगर्स ऑफ स्पीच या इंग्रजीच्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न



पुणे,19 सप्टेंबर 2023

 प्रा. संतोष थोरात व डॉ.संदीप गाडेकर लिखित पोएट्री अँड फिगर्स ऑफ स्पीच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पिसोळी, कोंढवा सासवड रोड, बोपदेव घाट पायथा येथे संपन्न झाला.

 


यावेळी महाराष्ट्र राज्य टीडीएफचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते राज्य सचिव ,लेखक, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी सिनेट मेंबर हिरालाल पगडाल, राज्याचे कार्याध्यक्ष जी के थोरात, पुणे शहराध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे, सचिन दुर्गाडे के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव जाधव,1 प्रा. शशिकांत शिंदे व मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाच्या अनावरण करण्यात आले.

 

प्रा.संतोष थोरात व डॉ. संदीप गाडेकर यांची यापूर्वीच इंग्रजीचे दोन पुस्तके प्रकाशित झालेले असून या पुस्तकामध्ये इंग्रजी कवितेचे प्रकार, कवितेमध्ये असलेल्या पोएटिक टर्म्स, अलंकार, क्रिटिकल ऍप्रिसिएशन ऑफ पोएट्री या गोष्टींचा अंतर्भाव असून विद्यार्थी, इंग्रजी विषय शिक्षक, इंग्रजी विषय घेऊन बी.ए. करणारे विद्यार्थी तसेच एम. ए. इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असल्याचे मत लेखकांनी व्यक्त केले. यापूर्वी डॉ. गाडेकर यांची 12 पुस्तके प्रकाशित झालेली असून या पुस्तक प्रकाशन बद्दल दोघांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी टीडीएफचे पदाधिकारी तसेच पुणे शहरातील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश