कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा येथे प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याच्या स्वागतासाठीफ्रेशर पार्टीचे आयोजन

कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा येथे प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याच्या स्वागतासाठीफ्रेशर पार्टीचे आयोजन



लोणावळा (प्रतिनिधी ) दि. २५ 

विदया प्रसारिणी सभेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा येथे प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी दि.१८ ऑक्टोबर २०२३ रोजी फ्रेशर पार्टीचे नियोजन केले होते. हा कार्यक्रम संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे व कार्यवाहक डॉ. सतीश गवळी सहकार्यवाहक श्री विजय  भुरके, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री नितीन गरवारे, श्री. अशोक मेहता आणि राजेश मेहता यांच्या प्रेरणेने महाविदयालयातील फ्रेशर पार्टी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरणासाठी संधी देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाकडून व संस्थेकडून काय अपेक्षा आहेत याबाबत मनोगत व्यक्त केले व्दितीय, तृतीय व अंतीम वर्षातील विदयार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुण सादर केले. 



प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांनी भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते. महाविदयालयातील अध्ययन- अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कलागुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. विदयार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मेजवानी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, डॉ. हरीश हरसुरकर, प्रो. हुसेन शेख व रोहित जगताप महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रो. सोनी राघो,  प्रो. प्राणेश चव्हण आणि प्रो. मनिषा कचरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. प्रिती चोरडे तसेच महाविद्यालयातील प्रो. रश्मी भूंबरे, प्रो मुबीन खान, प्रो. श्रुती सुखधान ,प्रो. पूनम पोफळकर, प्रो. तनुजा हुलावळे, श्री. पराग मराठे, सौ. स्नेहल कुटे, श्री.नंदू ठाकर,  श्री. किशोर देशमुख,  श्री.  गणेश खरमाटे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश