इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

 इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे निबंध  लेखन  स्पर्धेचे आयोजन 



तळेगाव दाभाडे: दिनांक २९ नोव्हेंबर २०२३

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे शनिवार दि. 25/11/2023 रोजी अँडव्होकेट पु. वा. परांजपे शाळेत  8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची  निबंध  लेखन  स्पर्धा घेण्यात आली.  इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ संध्या थोरात यांच्या कल्पनेला क्लब सदस्या शीतल शेटे यांनी  मूर्त रूप दिले.  या स्पर्धेत सहा शाळांमधील 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.  परीक्षक म्हणून दिपाली चव्हाण आणि  अर्चना  मुरूगकर यांनी  काम  पाहिले.  

विजेते विद्यार्थी आणि त्यांच्या शाळेचे नाव पुढीलप्रमाणे..

प्रथम क्रमांक-मंगेश प्रदीप राठोड प्रगती विद्यामंदिर, इंदोरी

द्वितीय क्रमांक-कुमारी सायली रामकृष्ण घोडके -परुळेकर विद्यामंदिर

तृतीय क्रमांक-लवण सूर्यकांत बेल्लेकर - आदर्श विद्या मंदिर

उत्तेजनार्थ

परम गोरख कुंभार - सरस्वती विद्यामंदिर

कुमारी आदिती भरत पवार -_अँ. पु. वा. परांजपे विद्यामंदिर

जय रमेश कढरे  _ अँ. पु. वा. परांजपे विद्यामंदिर

जयदीप घोडके नवीन समर्थ विद्यालय

सर्व  विजेत्यांना बक्षिसे व सर्व  सहभागींना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. अँ. पु. वा. परांजपे विद्यामंदिराच्या मुख्याध्यापक श्री  पोटे  सरांनी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे व  अध्यक्ष  संध्या थोरात यांचे  आभार  मानले.

ममता  मराठे  यांनी  उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश