अध्यापक महाविद्यालय, वडगाव - मावळचा 'बालिका दिन' संपर्क बालग्राम, भाजे येथे साजरा

 अध्यापक महाविद्यालय, वडगाव - मावळचा 'बालिका दिन' संपर्क  बालग्राम, भाजे येथे साजरा

     वडगाव मावळ दि. 7 (प्रतिनिधी) श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमातून वेगळा अनुभव व समाजाप्रती कृतज्ञता बिंबवण्याचा प्रयत्न करत असते. शैक्षणिक वर्ष २३-२४ मध्ये सांस्कृतिक विभागाचा पहिला कार्यक्रम ‘बालिका दिन’ ३ जानेवारी २०२४ रोजी अनाथ बालिकांसाठी कार्यरत समाजसेवी संस्था ‘संपर्क बालग्राम, भाजे’ येथे साजरा करण्याचे ठरले. आश्रमातील मुलींच्या शाळेच्या वेळेस अनुसरून हा कार्यक्रम ६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.

     सांस्कृतिक गट 'भरड धान्य - राळा' यांनी गट मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. शीतल देवळालकर यांच्या मार्गदर्शनाने हया कार्यक्रमाची रूपरेषा आखली. रुपाली तुपे हिने सूत्रसंचालन केले, नमिता ओव्हाळ हिने कार्यक्रमास आवश्यक सामग्रीची जमवाजमव केली. घुले रंजना हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संकल्प बालग्रामचे प्रकल्प अधिकारी श्री. अवधूत बोगार्डे सर यांची निवड करिष्मा घोटकुले हिने केली, ज्यास वैभव चंदनशिवेने अनुमोदन दिले. शीतल चव्हाण हिने अध्यक्षांचा परिचय करून दिला आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दीपाली गंगावणे हिने विद्यार्थी मनोगत मांडताना सावित्रीबाईंच्या सद्यस्थितीतील मुलींकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या, अश्विनी महाजन या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंचा वेष परिधान करून त्यांचा जीवनपट मांडला. सर्व आश्रमातील मुली, महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी एकत्रित स्त्रीच्या सद्यस्थितीतील अपेक्षांवरील गाणे एकत्रित गायिले. कार्येक्रमाचे अध्यक्ष श्री. बोगार्डे सरानी संस्थेच्या कार्यपद्धती बरोबर समाजाकडून अपेक्षित असणारी भूमिका व संस्थेतील मुलींच्या उज्वल भविष्याबद्दलची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. काजल आडकर हिने आभार व्यक्त केले. कार्यक्रमास संपर्क बालग्रामचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

     महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम गटप्रमुख प्राध्यापक डॉ. शीतल देवळालकर व त्यांच्या गटाने साजरा केला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कविता तोटे, डॉ. संदिप गाडेकर, सौ. ज्योती रणदिवे, सौ. सोनाली पाटील-महाजन, डॉ. अनुप्रिया कुमारी, ग्रंथपाल सौ. सुजाता जाधव-गंभीरराव, लिपिक श्री. मोहन कडू व श्री. सुरेश  घोजगे कार्येक्रमास उपस्थित होते.

     संस्थेचे संस्थापक माजी मंत्री श्री मदनजी बाफना साहेब, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री तुकारामजी असवले आणि संस्थेचे सचिव  श्री अशोकजी बाफना यांच्या पाठिंब्याने सातत्यपूर्ण बहुआयामी व्यक्तिमत्व जडणघडणीची प्रक्रिया संस्थेच्या प्रत्येक विभागात सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश