१२ वी बोर्ड परीक्षेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाची दिव्या भेगडे मावळ विभागात प्रथम

तळेगाव दाभाडे: दि 21 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२३-२४ रोजी घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयातील  मुलींनी बाजी मारली आहे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्याही वर्षी लागला असून कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशावर आपले नाव कोरले आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७%, वाणिज्य शाखेचा निकाल ८९.२२% इतका लागला असून कला शाखेचा निकाल ७३.२५% इतका लागला आहे. तंत्रशिक्षण विभागाचा निकाल हा ९२.५०% इतका लागला आहे. या निकालात याही वर्षी विद्यार्थिनींनी आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. 


विज्ञान शाखेतून कु.भेगडे दिव्या संदीप या विद्यार्थिनीने ९५.१७% इतके गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला असून. रसायनशास्त्र या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळवले आहे.


वाणिज्य शाखेतून कु. पडवळ सार्थक रोहिदास या विद्यार्थ्यांने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे. 


कला शाखेतून कु. मराठे वैष्णवी साहेबराव हीने ७५.३३%  गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. 


तंत्रशिक्षण विभागातून कु. शेख सानिया मेहबूब हिने ७४.००% गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक मिळविला आहे.


इंद्रायणी महाविद्यालयाचा शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे 

विज्ञान शाखा- 

१) कु. भेगडे दिव्या संदीप (९५.१७%)

२) कु. यादव अमोघ महेश (९०.००%)

२)कु. बोरसे अजय संजय (९०.००%)

३) कु.भसे अनुज संतोष (८९.८३%)


वाणिज्य शाखा-

१)प्रथम क्रमांक - कु. पडवळ सार्थक रोहिदास (८९.००%)

२)द्वितीय क्रमांक - कु. गुंजाळ प्रशांत दिलीप (८५.१७%)

३)तृतीय क्रमांक - कु. कांबळे रिया आनंद (८५.००%)


कला शाखा-

१)प्रथम क्रमांक - कु. मराठे वैष्णवी साहेबराव (७५.३३%)

२)द्वितीय क्रमांक - कु. अली नसरीन युसुफ (७५.१७%)

३)तृतीय क्रमांक - कु. खरमारे रेश्मा पांडुरंग (७४.५०%)


तंत्रशिक्षण विभाग 

१) प्रथम क्रमांक - कु. शेख सानिया मेहबूब (७४.००%)

२) द्वितीय क्रमांक - कु. राठोड दिनेश मोतीराम (६९.३३%)

३) तृतीय क्रमांक - कु. भांगरे मयुरी चंद्रकांत (६८.३३%)


विशेष प्राविण्यासह प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य 

प्रा. संदीप भोसले व सर्व संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश