पुणे (प्रतिनिधी) दि. 24 राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे या दोघांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयाची पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली. डॉ. शुभांगी कुऱ्हाडे यांनी या दोघांना टिळक शिक्षण व संशोन महाविद्यालय,पुणे या संशोधन केंद्रांतर्गत संशोधन मार्गदर्शन केले. पीएच. डी. संशोधन अहवाल सादरीकरण व मौखिक चाचणी परीक्षा शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे व बहिस्थ परीक्षक डॉ.चंद्रकांत बाविसकर यांच्या उपस्थित झाले. यावेळी आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन कांबळे, अध्यापक महाविद्यालय, अरणेश्वर चे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले, टिळक शिक्षण व संशोधन महाविद्यालयातील डॉ. विजय धामणे, डॉ. सुरेश इसावे, शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातील डॉ. वैभव जाधव, डॉ. गायत्री चौकडे , डॉ. बाळासाहेब मुरादे , डॉ.बरागडे, डॉ. स्मिता खोपडे उपस्थित होते. राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे या दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर व...
Congratulations
ReplyDelete