इंद्रायणी महाविद्यालयात 'जागतिक ओझोन दिनानिमित्त' पर्यावरण जागृती कार्यक्रम संपन्न

 

तळेगाव दाभाडे दि. २४ (प्रतिनिधी) येथील इंद्रायणी महाविद्यालयातील विज्ञान विभाग व इंद्रायणी निसर्ग कट्टा यांच्या वतीने जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, विज्ञान विभागप्रमुख डॉ. रोहित नागलगाव, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. काशिनाथ अडसूळ, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे तसेच विज्ञान विभागातील विविध प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मित्रांसोबत केक कापून परदेशी संस्कृती आत्मसात न करता वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घ्यावा. भांडवलशाहीचे विस्तारीकरण व बाजारपेठा म्हणून पुढे आलेला प्रत्येक देश यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढत असून हरित वायू उत्सर्जनाचे अनेक विपरीत परिणाम वातावरणावर होत आहेत. पृथ्वीवर माणूस म्हणून व्यवस्थित जगायचे असेल तर ओझोनचा थर सुव्यवस्थित राखणे तसेच निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी ठरते आणि म्हणून निसर्गाचे संवर्धन तरुणाईच्या हातात असल्याचे प्राचार्य डॉ. मलघे यांनी सांगितले.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभागप्रमुख डॉ. रोहित नागलगाव यांनी केले. याप्रसंगी ओझोन थर जतन करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापिका सौ. पूजा तल्लुर यांनी विद्यार्थ्यांकडून ओझोन जनजागृती निमित्ताने काही प्रात्यक्षिके सादर करून घेतली. तसेच महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जागृती करण्याचे काम यांनी केले. तसेच त्यांनी ओझोन थराबद्दलची वैज्ञानिक माहिती आणि सध्याच्या आधुनिक जगात वाढत्या तापमानवाढीचे ओझोन थरावर होणारे परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विषयांचे प्राध्यापक, विभाग प्रमुख व सुमारे ३४२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे व अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश