तळेगाव दाभाडे येथील निवासी डॉक्टरांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

 

तळेगाव दाभाडे दि.२२ (प्रतिनिधी) येथील मायमर मेडीकल कॉलेज व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना जर केंद्र व राज्यसरकारच्या नियमानुसार विद्यावेतानामध्ये वाढ न केल्यास कॉलेज प्रशासनाला निवासी डॉक्टरांनी २४ सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) व राज्य सरकार यांनी वेळोवेळी निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतानामध्ये वाढ केलेली आहे, परंतु मागील एक वर्षापासून कॉलेज प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या सरकारच्या अधिनियमांची अंमलबजावणी झालेली नाही. निवासी डॉक्टरांच्या दैनंदिन व आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी या निर्णयांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कॉलेज प्रशासनाला मागील ३ आठवड्यापासून आंदोलनाचा इशारा देऊनसुद्धा अजून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. निवासी डॉक्टर मागील २ आठवडे रुग्णसेवा देत असताना काळी फीत लावून आंदोलन करत आहेत, जर २४ सप्टेंबरच्या आत विद्यावेतन वाढीबाबत निर्णय न झाल्यास निवासी डॉक्टर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करणार आहेत. या दरम्यान अत्यावश्यक सेवा फक्त चालू राहतील. या आंदोलनाला केंद्रीय महाराष्ट्र असोसिएशन. ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (Central MARD Maharashtra Association of Resident Doctors) यांनी सुद्धा पूर्णपणे पाठींबा दिला आहे.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक मोबाईल 820 818 50 35

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश