आनंद विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला अनोख्या उपक्रमाचे आयोजन

 

पुणे दि. 13 (प्रतिनिधी ) आनंद विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला स्वरचित कविता सादर करण्याचा अनुभव, निमित्त होते मराठी भाषेला मिळालेल्या अभिजीत दर्जाच्या अनुषंगाने श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेच्या आनंद विद्यानिकेतन हायस्कूल व काव्यवाणी काव्यसंस्था, पुणे यांच्याद्वारे आयोजित कार्यक्रमाचे. सदर कार्यक्रम संस्थेच्या कार्यवाह  श्रीम. किरण तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत आयोजित करण्यात आलेला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजातील स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.



      या उपक्रमांतर्गत प्रसिद्ध ग्रामीण कवी, (आळाशी या कवितेचा इ. 8 वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश, तसेच किणकीण घुंगराची या कवितेचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (SYBA) मराठी विषयात  समावेश) चित्रपट तसेच  विविध मालिका शीर्षक गीतकार,‌कवीवर्य श्री.हनुमंत चांदगुडे यांच्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांचा काव्य निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवत इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील आळाशी कवितेची निर्मिती, पार्श्वभूमी तसेच तिचा अर्थ विद्यार्थ्यांना उलगडून दाखवला. तसेच अतिशय सुंदर अशा त्यांच्या स्वतःच्या कविता त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर सादर केल्या. आपल्या मार्गदर्शन पर मनोगत मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काव्य लेखनासंबंधीचे नियम तसेच काव्य लेखन करताना काय काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी काही स्वरचित कविता सादर केल्या याबद्दल काव्य संस्थेच्या वतीने विद्यार्थी नवोदित कवींना प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.


आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक  लक्ष्मण मासाळ यांनी विद्यार्थ्यांच्या काव्यप्रतीभेचे कौतुक करून काव्यवाणी काव्य संस्थेच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले. या काव्यवाचनामधून इयत्ता दहावीतील सुनील तळेकर या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

यावेळी संत गोरोबा बाल विद्यानिकेतनचे  मुख्याध्यापक सतीश पाटील, काव्यवाणी काव्य संस्थेच्या अध्यक्षा वाणी ताकवणे, उपाध्यक्ष चैतन्य काळे तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष थोरात यांनी केले तर आभार प्रशांत म्हेत्रे यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संतोष थोरात यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी केले होते.


बातमी व जाहिरात संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो. 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश