ट्रेकिंग पलटनची दिवाळी पहाट भंडारा डोंगरावर स्वच्छता करून साजरी

 


तळेगाव दाभाडे दि. २ (प्रतिनिधी) व्यक्ती आणि समूह आपापल्या पद्धतीने दिवाळी पहाट साजरी करत असतात.  ट्रेकिंग फलटन पुणे आपली दिवाळी पहाट गडकिल्ले, लेणी किंवा एखाद्या धार्मिक पर्यटन स्थळी स्वच्छता करून साजरी करत असते. यावर्षी 2 नोव्हेंबर 2024 रोजी  ट्रेकिंग पलटनच्या सदस्यांनी संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या भंडारा डोंगर परिसरात तसेच येथील बौध्द लेणी परिसरात प्लास्टिकचा कचरा गोळा करून स्वच्छता केली.

या परिसरात उन्हाचे चटके जास्त जाणवत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आणि शीतपेये प्यायले जातात आणि पिवून झाल्यानंतर ते वाटेल तिथे फेकून दिल्या जातात.

संत तुकाराम महाराजांचे मंदिर ते बौद्ध स्तूप आणि विठ्ठल मंदिर या मार्गावर भेट देणाऱ्यांनी टाकून दिलेला प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट स्नॅक्स पॅकेट्स, एनर्जी ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक यांच्या बाटल्या गोळा करून परिसर स्वच्छ केला.

या ट्रेकिंग पलटन पुणेच्या या स्वच्छता मोहिमेत  श्री ज्ञानेश्वर पुरी, श्री महेश केंद्रे, श्री नितीन बागले आणि डॉ. सुरेश इसावे यांनी योगदान दिले. या नियोजनात त्यांना डॉ. संदीप गाडेकर यांची मदत झाली. ट्रेकिंग फलटण पुणे यांची ही 112 वी मोहिम होती.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश