Skip to main content
नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे दिनांक 26 (प्रतिनिधी) नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे सकाळी ठीक साडेसात वाजता नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपक्रमशील सचिव माननीय संतोषजी खांडगे साहेब यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेची पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांनी मान्यवरांना मान वंदना देऊन उत्तम असे संचलन केले. यावेळी शासन परिपत्रक प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूह गीत गायन समूह गीत, नृत्य भाषण घरघर संविधान अंतर्गत विद्यार्थी शिक्षक पालक यांनी सेल्फी काढली व प्रभात फेरी यासारखे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यावेळी या सर्व उपक्रमाला अनुराधा हुलावळे, मिरा शेलार, युवराज रोंगटे, बळीराम माळी, बापूसाहेब पवार, वृषाली जगताप, ऐश्वर्या शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले या कार्यक्रमास मार्गदर्शन शालेय समितीचे अध्यक्ष महेश भाई शहा शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे पर्यवेक्षक शरद जांभळे यांनी केले.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment