हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेज चे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर बोरिवली येथे संपन्न


वडगाव मावळ दि. 24 (प्रतिनिधी)हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेज चे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर बोरिवली ता.मावळ येथे पार पडले शिबीराचे उदघाट्न संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम असवले व संचालक राज खांडभोर यांच्या हस्ते झाले. स्त्रियांनी सर्व क्षेत्रात नावलौकिक मिळवावे व ग्रामीण संस्कृती जपावी असे आवाहन केले. 


तीन दिवसांच्या या शिबिरात योग, कवायत, ग्रामस्वच्छता, खेळ, मनोरंजन, व्याख्यान, शेकोटी असे विविध उपक्रम राबविण्यात आले. अतुल सावखंडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून हातचालखी कशी केळी जाते हे प्रयोगाने सिद्ध केले व सर्पाविषयी समज व गैरसमज यावर व्याख्यान दिले तसेच सचिन ढोबळे यांनी अतिशय प्रभावीपणे माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र सांगितले. 


शिबिराचा समारोप प्रसंगी गावचे सरपंच नामदेव शेलार, बाळासाहेब कदम उपस्थित होते. शिबिरास संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिबीर प्रमुख प्राचार्य हिरामण लंघे, शिबीर संचालक प्रा. डॉ. मनोज गायकवाड, शिबीर सहसंचालक प्रा. शितल गवई, प्रा. राजेंद्र डोके, प्रा. शुभांगी हेंद्रे, प्रा.योगेश जाधव, नंदकिशोर मुगेरा, सोमनाथ धोंगडे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास