टि.जे.महाविद्यालयाच्या 'टिजम 'या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन

खडकी दि.26 (प्रतिनिधी) : मैत'  हा एक आगळा वेगळा आणि 'हटके' विषय विद्यार्थ्यांना देऊन संपादक मंडळाने विद्यार्थ्यांना लिहायला प्रवृत्त केले याचा अधिक आनंद होतो आहे. विविध जाती धर्मामध्ये जन्म संस्कार व मृत्यू विधीच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्मामध्ये मृत्यू विषयीच्या विविधचाली, रीती, रूढी,परंपरा जशा आहेत, उदाहरणार्थ अंत्यसंस्कार सावडण्याचा विधी, दशक्रिया विधी,तेरावा  याप्रमाणेच मुस्लिम ख्रिश्चन शीख, जैन  व बौद्ध धर्मीयांच्याही मृत्यूनंतरच्या विधी विषयीची माहिती या विशेष अंकामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण अशी दिलेली आहे. त्याबद्दल मनापासून आनंद वाटला, महाराष्ट्रातील संपूर्ण महाविद्यालय विश्वामध्ये असा आगळावेगळा विषय वार्षिक नियतकालिकासाठी नक्कीच यापूर्वीही आलेला नसेल,याची खात्री आहे खरे तर जगणं खूप सुंदर आहे,परंतु अखेरचा निरोप घेताना मरणालाही हसत हसत सामोरे जावे हेच खरे सत्य आहे. " असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुमार गोयल यांनी केले.



   खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या मैत या विषयावरील वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन आज श्री कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाले, यावेळी भारत भारतीया संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अचल जैन, भारत भारती पुणे शहराचे समन्वयक श्री समीर पंड्या, श्री किरण अस्तगावकर, खडकी शिक्षण उपाध्यक्ष अनिल मेहता, चिटणीस आनंद छाजेड, रमेश अवस्थे, राजेंद्र भुतडा, प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी या विषयाची अभिनव संकल्पना या मनोगतातून सांगितली.



   अचल जैन यांनीही हा वेगळ्या धाटणीचा विषय वार्षिक नियतकालिकामधून महाविद्यालयाने हाताळलेला आहे. हा अंक वृत्तपत्रानी नोंद घेण्यासारखाच आहे, असे गौरवोदगार काढले.

उपप्राचार्य महादेव रोकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

 प्रा. अर्चना तारु यांनी आभार प्रदर्शन केले.या या कार्यक्रमासाठी संपादक मंडळातील प्रा. डॉ. अविनाश कोल्हे डॉ.निलेश काळे यांनी सहकार्य केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

 


Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के