“हाती होते शून्य तरीही...” पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न



तळेगाव दाभाडे दि.३० (प्रतिनिधी)  "वडिलांविषयी असलेल्या कृतज्ञापोटी मुलाने लिहिलेले आत्मचरित्र हे आजच्या युगात अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्वसामान्य वडिलांची संघर्ष कथा म्हणून हे पुस्तक निश्चितपणे वाचण्यासारखे आहे." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी केले. लेखक, गडकिल्ले अभ्यासक, म.सा.प. मावळ शाखेचे कार्याध्यक्ष ओंकार वर्तले यांच्या "हाती होते शून्य तरीही .."  या नाविन्य प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन लाखे  यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते  बोलत होते. राजन लाखे यांनी विविध दाखले देत आणि कवितेच्या ओळी उद्धृत करत वडील आणि मुलाच्या नात्याची मोठ्या खुमासदार गुंफण केली.  



ओंकार वर्तले यांनी त्यांच्या वडिलांच्या संघर्षावर हे पुस्तक लिहिले आहे. मसाप मावळ शाखेच्या वतीने  मोठ्या दिमाखात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते राजेंद्र घावटे, ज्येष्ठ विधिज्ञ हेमंत भोपटकर,  म. सा. प. मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे,  पं किरण परळीकर, महादेव वर्तले  आदी मान्यवर उपस्थित होते. 


ओंकार वर्तले यांनी आपल्या मनोगतामध्ये, “वडिलांनी आयुष्यात केलेल्या संघर्षामुळे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली तसेच प्रत्येक मुलाच्या आयुष्यात  वडील हेच आदर्श असायला हवे” सांगितले. 


ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना या आत्मचरित्राची भाषा अतिशय साधी, सोपी आणि रसाळ असल्याचे सांगितले तसेच हे पुस्तक म्हणजे मुलाने वडिलांना दिलेली अनोखी भेट आहे असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे राजेंद्र घावटे व पंडित किरण परळीकर यांचीही यावेळी मनोगते झाली.  



श्रीकृष्ण पुरंदरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया केसकर  यांनी केले तर आभार डॉ. माधुरी वर्तले यांनी मानले. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ जीवन तनपुरे, संग्राम जगताप, उमाकांत कुलकर्णी, प्राचार्य सुहास सपाटे, प्रा. सागर बुरुड, प्रदीप लिमये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश भोसले, अभय व्यास, गजानन घबाडे, सुहास शेट्टी, आदींनी परिश्रम घेतले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के