श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे उत्साहात आयोजन


तळेगाव दाभाडे दि.२६ (प्रतिनिधी) श्री. स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत केले होते.



आज पुण्यतिथी निमित्त सांगता समारंभास उद्योजक व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी अखंड नाम जप यज्ञ जीवनात का आवश्यक आहे याचे महत्त्व तसेच जीवनात वेदांचे किती महत्त्व आहे याची माहिती दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे पटवून दिले. मी अजूनही विद्यार्थीच आहे तसेच त्यांना स्वतःच्या आयुष्यात स्वामी सेवेचा आलेला अनुभव त्यांनी कथन केला.



  सर्व कर्माचा उद्देश भगवंतालाच (विष्णुला) प्रसन्न करणे होय म्हणुन मनुष्याने नेमुन दिलेले यज्ञ केल्याने उद्दिष्ट साध्य होते. परंतु प्रत्यक्ष विष्णुची सेवा म्हणजेच परब्रम्ह भगवान श्री दत्त महाराजांची सेवा केली तर कर्माच्या सर्व दुःखातुन, दोषातून मनुष्य मुक्त होतो असे देखील त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात वर्षातुन दोन वेळा म्हणजेच श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व श्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ साजरे केले जातात. 

या सप्ताह कालावधीत तळेगाव दाभाडे स्टेशन केंद्रात हजारोंच्या स्वामीभक्त उपस्थित होते.  श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ, विविध याग व नित्य स्वाहाकार या ठिकाणी करण्यात आले.



 या सप्ताह काळात ग्रामअभियाना अंतर्गत वैयक्तिक, सामाजिक अडचणी पितृदोष, कुलदेवतादोष, वास्तुदोष, ग्रहपीडा, नोकरी, व्यापार उद्योग, व्यसन, शिक्षण, शेती, आरोग्य, विवाह यात्सारख्या समत्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले. सप्ताहाच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान हरिभक्त पारायण आशा नंदकुमार शेटे यांना कर्म सिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे मोलाचे सहकार्यआणि मार्गदर्शन लाभले तसेच या केंद्रातील सर्व सेवेकरी महिला व पुरुष यांनी योग्य नियोजन करून सप्ताह उत्साहात पार पाडला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

 

Comments