राष्ट्र प्रथम मानणारी पिढी तयार झाली पाहिजे - कृष्णकुमार गोयल




खडकी दि. 26 : राष्ट्र प्रथम, आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून सर्वांनी राष्ट्रासाठी काम करणे, हे अत्यंत महत्त्वाचे असून येणाऱ्या काळात, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हेच एकमेव ध्येय ठेवून राष्ट्रासाठी आपला उभा जन्म देणारी पिढी तयार व्हायला हवी. भारत भारतीचा उपक्रम या दृष्टीने अखंड भारतात झाला पाहिजे, असे गौरव उद्गार श्री.कृष्णकुमार गोयल यांनी काढले, खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये भारत भारती या संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा समारंभ आज आयोजित करण्यात आला होता, यावेळी भारत भारतीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अचल जैन, भारत भारती चे पुणे जिल्ह्याचे समन्वयक समीर पंड्या, किरण अस्तगावकर, उपाध्यक्ष अनिल मेहता, खडकी शिक्षण संस्थेचे चिटणीस आनंद छाजेड, संस्था पदाधिकारी रमेश अवस्थे राजेंद्र भुतडा आणि संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अचल जैन यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, समाजामधील विविध जाती धर्मांमध्ये जातीय सलोखा आणि शांतता नांदावी सर्वांनी बंधुभावाने वागावे यासाठी भारत भारती ही संस्था कार्य करत आहे,आणि त्या दृष्टीने भारत भारतीय संस्थेचे समाजासाठी योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.



  भारत भारतीय संस्थेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकमेकाशी मित्रत्वाची आणि बंधुतेची भावना ठेवून एकमेकांच्या घरी राहणे निवास करणे आणि एकमेकांच्या चालीरीती रूढी परंपरांमध्ये समरस व्हावे, असे श्री. समीर पंड्या यांनी सांगितले.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर एन.एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.



 भारत भारतीय उपक्रमामध्ये सहभागी झालेली राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कुमारी व्हिक्टोरिया जोसेफ हिने 

प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले भारत भारतीच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.

 या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपप्राचार्य महादेव रोकडे यांनी केले तर प्रा.अर्चना तारू यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

 

Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के