पुणे जिल्हा माध्य व उच्च. माध्य. शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद गायकवाड तर सचिव पदी शिवाजीराव कामथे यांची बिनविरोध निवड

 

पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) पुणे जिल्हा माध्य.व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा नुकतीच 15 ऑगस्ट चौक पुणे या कार्यालयात मावळते अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख विश्वस्तांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सर्वानुमते श्रीयोग माध्यमिक विद्यालय दौंड  चे मुख्याध्यापक प्रसाद गायकवाड यांच्या अध्यक्षपदी तर रामराज्य माध्यमिक विद्यालय बिबवेवाडीचे मुख्याध्यापक शिवाजीराव कामथे यांचे सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली.



  पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ ही जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकाची शिखर संघटना असून शाळांचे वार्षिक नियोजन, परीक्षा आयोजन नियोजन तसेच सरकार व शाळा यांच्यामध्ये दुवा साधून समन्वयाचे कार्य  करत असते.



सदर निवडी बिनविरोध पार पाडण्यासाठी विश्वस्त अरुण थोरात, शिवाजीराव किलकिले, हनुमंत कुबडे, शांताराम पोखरकर,हरिचंद्र गायकवाड, नंदकुमार सागर,चंद्रकांत मोहोळ, महेंद्र गणपुले, सुजित जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.



 येणाऱ्या काळामध्ये शाळा व सरकार यांच्याशी योग्य समन्वय साधून शाळांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत  नवनिर्वाचित सचिव  शिवाजीराव कामथे यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विश्वस्तांच्या व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष- प्रसाद गायकवाड (दौंड), कार्याध्यक्ष राजेश गायकवाड (मावळ), तानाजी वागदरे( जुन्नर) कल्याण बर्डे (हवेली) सुधाकर जगदाळे(पुरंदर) सचिव- शिवाजी कामथे पुणे, सहसचिव- उत्तमराव पोटवडे (खेड), मारुती, कदम (शिरूर), संभाजी पडवळ (पिंपरी चिंचवड), गणपत गवळी (बारामती) विद्यासचिव- भानुदास रिठे,( पुणे शहर) विद्यासहसचिव- जगन्नाथ पाटील( इंदापूर) गणेश काळे, (पिंपरी चिंचवड) दत्तात्रय चाळक (मुळशी), मोहनराव ताकवले (भोर), खजिनदार विनोद बोंबले (आंबेगाव), सह खजिनदार-मोहन किन्हाळे (वेल्हे), गणेश घोरपडे (दौंड) वार्तापत्र संपादक- रामचंद्र नातू (दौंड) सहसंपादक-संजय बोरकर (खेड), लक्ष्मण जगताप (हवेली) हनुमंत पवार पुरंदर), वंदना आणेकर (पुणे शहर), अंतर्गत हिशोब तपासणीस- तुकाराम बेनके (शिरूर), सहअंतर्गत हिशोब तपासणीस- गौरी टन्नू (पुणे शहर), बिगर मराठी माध्यम शाळा प्रतिनिधी- सिकंदर शेख (बारामती),आश्रम शाळा प्रतिनिधी- तुकाराम शिरसाट (शिरूर), दिव्यांग शाळा प्रतिनिधी- दिलीप काळे (पुणे शहर) स्वयंअर्थ सहाय्य, इंग्रजी माध्यम प्रतिनिधी-पुनम शेवाळे (हवेली)

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के