मावळ तालुक्यातील इयत्ता १०वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध

 

तळेगाव दाभाडे दिनांक 25 (प्रतिनिधी ) मावळ तालुक्यातील इयत्ता १०वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी ज्युनिअर कॉलेजच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांना केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या अकरावी प्रवेशाच्या प्रवेश फॉर्म भरताना अनेक अडचणी येत असून त्या सुलभ करण्यासाठी इंद्रायणी विद्या मंदिर च्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन फॉर्म भरून दिले जाणार आहेत. 


इयत्ता ११वी प्रवेशासाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत पुढील कागदपत्रे आणावीत
१) इयत्ता १०वी परीक्षेचे गुणपत्रक (Online)
२) विद्यार्थी आधार कार्ड
३) पासपोर्ट साईज २ फोटो
४) आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल
५) इयत्ता १० वी शाळा सोडल्याचा मूळ दाखला (ORIGINL)
६) विद्यार्थ्यांचा/पालकांचा जातीचा दाखला (लागू असल्यास)
७) ईडब्ल्यूएस (EWS) पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
८) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
९) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१०) प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
११) आजी-माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१२) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा विजेते / सहभाग प्रमाणपत्र
स्थळ : इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे
कालावधी : सोमवार दि. २६ मे २०२५ ते ०३ जून २०२५
वेळ : सकाळी ०९:३० ते दु. ०४:३० वाजेपर्यंत
For More Details Contact
COMMERCE - 9922051513 / 9921917908
SCIENCE-9503270703 / 9860451074
ARTS - 9922237112  /  9970198870

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के