आजम कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये विद्यार्थ्यांचे सामाजिक व भावनिक कौशल्ये विकसन ' या विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न



पुणे दि. 22 प्रतिनिधी एम.सी.ई . सोसायटी, डॉ.पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या एच.जी.एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या वतीने दिनांक 21 मे 2025 रोजी  विद्यार्थ्यांचे सामाजिक व भावनिक कौशल्ये विकसन ' या विषयावर राष्ट्रीय  वेबिनार आयोजित करण्यात आले होते.या राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारला विद्यार्थी,संशोधनार्थीं, शिक्षक तसेच प्राध्यापकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.या वेबिनार साठी  डी. डी. चोकसी कॉलेज ऑफ सेकंडरी एज्युकेशन, पालनपुर गुजरात येथील डॉ.निलू  घोष मुख्य वक्ते म्हणून लाभल्या होत्या .तसेच दुसऱ्या सत्राच्या वक्त्या ज्ञान प्रबोधिनीच्या ॲकडेमिक विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.धनश्री सोवनी यांनी विद्यार्थ्यांमधील भावनिक आरोग्य व त्यात येणाऱ्या अडचणी या विषयावर आपले विचार मांडले.



चिन्मया विश्व विद्यापीठ, एर्नाकुलम केरळ येथील स्कूल ऑफ एथिक्स गव्हर्नन्स कल्चर अँड सोशल सिस्टीम  विभाग प्रमुख , सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रमोद दिनकर,यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडत वेबीनारच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कौशल्ये बळकट करणे व सहाय्यक शालेय वातावरणासाठी अडथळ्यांवर मात करणे या विषयावर सहभागींशी संवाद साधला. डॉ. पी. ए.इमानदार विद्यापीठाच्या,एच.जी.एम.आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या अधिष्ठाता व प्राचार्या  व या राष्ट्रीय वेबीनारच्या संयोजक डॉ.अनिता बेलापूरकर  यांनी सध्याचे स्पर्धेचे जग, सोशल मीडिया चा अतिवापर या गोष्टी लक्षात घेता वेबीनार चा हा विषय निश्चित केल्याचे सांगितले.



या कार्यक्रमास सर्व शिक्षणसंस्थांचे  प्रमुख, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका, संशोधनार्थी, अभ्यासक यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.साठ पेक्षा अधिक सहभागिनी यात आपला सहभाग नोंदवला.प्राध्यापक डॉ.माधुरी यादव यांनी कार्यक्रम समन्वयक  आणि डॉ.पूनम सोनवणे यांनी कार्यक्रम उपसमन्वयक म्हणून या  राष्ट्रीय वेबिनार चे काम पाहिले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के