श्री एकविरा विद्यामंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स कार्ला येथे योग दिन उत्साहात साजरा

    कार्ला दि. 21 (प्रतिनिधी) श्री एकविरा विद्यामंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स कार्ला येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण देशभरात योगदिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे आमच्या विद्या मंदिरात देखील जागतिक योग दिन सकाळी ठीक साडेआठ वाजता सभागृहामध्ये साजरा करण्यात आला.



    सर्वप्रथम पर्यावरण प्रमुख विवेक भगत यांनी सुदृढ आणि निरोगी  शरीरासाठी,मन आणि बुद्धी  साठी योगासनांची गरज विद्यार्थ्यांना पटवून दिली. प्राचार्य संजय वंजारे व विवेक भगत यांनी विद्यार्थ्यांना योगासने दाखवली व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून करून घेतली. यामध्ये सूर्यनमस्कार पद्मासन प्राणायाम, शीर्षासन, अशी वेगवेगळी अनेक योगासने घेण्यात आली.


 वैजयंती कुल व पल्लवी दुश्मन, सोनल साळुंखे यांनी सुद्धा योगासनांचे विविध प्रकार घेतले.
   संजय वंजारे, विवेक भगत व बाबाजी भाऊ हुलावळे  यांनी शीर्षासन, वृक्षासन, ताडासन यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. संजय हुलावळे, नरेंद्र इंदापुरे, उमेश इंगळुळकर, संगीता खराडे, अलका आडकर, श्रद्धा मोहळ, वैजयंती शेवाळे या सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुनियोजित पार पडला. गायत्री मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments