मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सोपान असवले यांची तसेच उपाध्यक्ष धनकुमार शिंदे,कार्यकारी संचालक अशोक कराड यांची बिनविरोध निवड

वडगाव मावळ दि. 19 (प्रतिनिधी) मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या नविन कार्यकारणीची निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक वडगाव चे सहाय्यक निबंधक श्री पवार बापूसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया करण्यात आली अध्यक्षपदासाठी सोपान संता असवले यांची तसेच उपाध्यक्ष धनकुमार शिंदे, कार्यकारी संचालक अशोक कराड या सर्वाचीच एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. 

निवड यावेळी विद्यमान अध्यक्ष भारत काळे, कार्यकारी संचालक राम कदमबांडे, खजिनदार भाऊसाहेब खोसे याच्या उपस्थितसह संस्थेचे संस्थापक विलास भेगडे, यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे, मुख्यप्रवर्तक धनजय नांगरे तसेच माजी अध्यक्ष नारायण असवले ,सर्व मान्यवर संचालक विजय वरघडे, रियाज तांबोळी, दिलीप पोटे, अमोल जाधव, दत्तात्रय गायकवाड, सुमन जाधव, वैजयंती कुल संस्थेच्या व्यवस्थापक ज्योती मॅडम मावळ प्राथमिक पतसंस्थेचे मा अध्यक्ष केंद्रप्रमुख मुकुंद तनपुरे, शिक्षक नेते राजू भेगडे ,भांड सर ,बारस्कर सर इत्यादी उपस्थित होते.



 प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब आगळमे यानी आपल्या मनोगतात संस्थेचे सभासद वाढवून सभासदांना योग्य ती सेवा द्यावी. मान्यवरांचे आभार कार्यकारी संचालक राम कदमबांडे  यांनी मानले.



डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के