पवना शिक्षण संकुलात योग दिन साजरा १००० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अनुभवली योगाचे धडे

 

 पवनानगर दि. 21 (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पवना शिक्षण संकुल पवनानगर येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पवना शिक्षण स़कुलातील भव्य दिव्य माजी विद्यार्थी सांस्कृतिक सभागृहात १००० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगाचे धडे देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना योग्य आणि प्राणायाम याचे महत्त्व सांगण्यात आले.




यावेळी बोलताना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे म्हणाले की,भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा आणि योग, योगासने त्याचबरोबर योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.  शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खुप गरजेचे आहे.



  योग शिक्षिका वैशाली वराडे यांनी योगाचे व प्राणायमाचे महत्व सांगितले आजच्या या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले शरीर तंदरूस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करतात येतात. 



संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे,क्रिडा विभाग प्रमुख गणेश ठोंबरे, वैशाली वराडे, नेहा बारमुख, राजकुमार वरघडे, वर्षा पोखरकर यांनी योगांची प्रात्यक्षिके करुन दाखवली. 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के