शिक्षक हा समाजाचा कणा असून शिक्षकांच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये पतपेढीचे अनन्य साधारण महत्व - कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीचा जीवनगौरव व निवृत्त सभासद, गुणवंत शिक्षक सभासद व गुणी पाल्य सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

 

पुणे दि. 26 (प्रतिनिधी) पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार, निवृत्त सभासद, गुणवंत शिक्षक सभासद व  गुणवंत पाल्यांच्या सन्मान सोहळा नुकताच मॉर्डन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी सर होते. 



यावेळी पतपेढीच्या वतीने पतपेढीचे संस्थापक स्व.मो.गो. चाफेकर  सरांच्या  नावे दिला जाणारा पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. गजानन एकबोटे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पतपेढीचे अध्यक्ष राज मुजावर, उपाध्यक्ष दत्तात्रेय नाईक, खजिनदार पुष्पक कांदळकर तसेच पतपेढीचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये शाल श्रीफळ मानपत्र तसेच 25 हजाराच्या धनादेशाचा समावेश होता. यावेळी मानपत्राचे वाचन पतपेढीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव कामथे सरांनी केले.


 प्राध्यापक डॉ. सुरेश गोसावी सर यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षक हा समाजाचा कणा असून शिक्षकांच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये पतपेढीचा अनन्यसाधारण महत्व असून येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये पतपेढीचा उत्तरोत्तर आर्थिक विकास होत राहो असे अपेक्षा व्यक्त केली.



        यावेळी पतपेढीच्या वतीने निवृत्त सभासद, गुणवंत शिक्षक सभासद, तसेच गुणवंत पाल्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सन्मानचिन्ह व रोख बक्षिसाचा  समावेश होता
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतपेढीचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर यांनी केले तसेच पाहुण्यांची ओळख व परिचय  मा. अध्यक्ष विजयराव कचरे ,संचालक डॉ.कल्याण वाघ यांनी केले. गुणवंत पाल्य व गुणवंत शिक्षक सभासद यादी वाचन संदीप घोलप,  हर्षा पिसाळ , धोंडीबा तरटे यांनी केले.



यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या मेंबर डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, हेमलता मराठे, महाराष्ट्राचे टीडीएफ चे अध्यक्ष जी.के. थोरात सर, महाराष्ट्रा राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष मा. हरिचंद्र गायकवाड सर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे मा. अध्यक्ष श्री. सुजित जगताप सर, डॉ.अ.ल. देशमुख सर, ताकवले सर, रणशूर सर तसेच पतपेढीचे आजी-माजी संचालक व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शिवाजीराव कामथे, महादेव माने, विजयराव कचरे, संदीप घोलप, दत्तात्रय हेगडकर, संजय लोंढे सर, धोंडीबा तरटे, हर्षा पिसाळ, डॉ. मंगल शिंदे, दत्तात्रेय नाईक पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सुतार, ज्ञानेश्वर कानवडे, आनंद घारे, आलोक कंक, दीपक सर यांनी केले होते.
 सर्व सभासदांच्या वतीने आभार पर मनोगत श्रुतिका सरोदे, संतोष थोरात, कल्पना कोल्हे, मेधा सिन्नरकर यांनी केले.
यावेळी पतपेढीचे आजी-माजी संचालक, निवृत्त सभासद, शिक्षक बंधू भगिनी व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा

विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार - डॉ. व्ही. बी.गायकवाड