व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

लोणावळा दि. २४ (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तुकडी BSF-142 अंतर्गत भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पुष्पांजली अर्पणाने झाली. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. भगवान आंबेकर, ॲड. संदीप अगरवाल, श्री. नितीन गरवारे व श्री. स्वप्नील गवळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या प्रेरणेमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांच्या जीवनावर आधारित भाषणांचे सादरीकरण केले. “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख, प्रा. सोनी राघो, प्रा. सायली धरणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा शाह, प्रा.प्रिती चोरडे, प्रा. किरण शारीकर, प्रा. तनुजा हुलावळे, प्रा. सुनिल परगे, प्रा. नम्रता जंगम, प्रा. अमिषा नाईक, प्रा. अनुप देशमुख, प्रा. श्रीकांत घाटगे, प्रा. मोनाली देशमुख, प्रा. मानसी बसुतकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. श्रद्धा पुजारी, श्री.पराग मराठे, श्री. नंदू ठाकर, स्नेहल कुटे,वैभव कापसे, रघुनाथ शेडगे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/


Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा