तळेगावचा अभिमान :विशाल शेटे व महेश भेगडे यांचा आयरनमॅन इटली मधील पराक्रम
तळेगाव दाभाडे: येथील रहिवासी विशाल चंद्रकांत शेटे व महेश तानाजी भेगडे यांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी इटली येथे पार पडलेल्या आयरनमॅन इटली ट्रायथलॉन या जगातील सर्वात कठीण एकदिवसीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करत देशाचे नाव उज्ज्वल केले. आयरनमॅन – जगातील सर्वात कठीण एकदिवसीय स्पर्धा आयरनमॅन ट्रायथलॉन ही क्रीडा स्पर्धा खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. या स्पर्धेत खेळाडूंना एकाच दिवशी, सलगपणे खालील अंतर पूर्ण करावे लागते : •समुद्रात पोहणे – 3.8 किमी •सायकलिंग – 180 किमी •मॅरेथॉन धावणे – 42.2 किमी यामध्ये वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळावी लागते. पोहण्यासाठी 2 तास 20 मिनिटे, पोहणे व सायकलिंग 10 तासांत तर संपूर्ण स्पर्धा 16 तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे ही स्पर्धा फक्त शारीरिक ताकदीवर नव्हे तर मानसिक चिकाटी, आत्मविश्वास व धैर्यावर आधारित असते. गुरु-शिष्य जोडीचा पराक्रम विशाल शेटे यांनी याआधी दोन वेळा आयरनमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, इटलीतील ही त्यांची तिसरी कामगिरी ठरली. तर महेश भेगडे यांनी प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे महेश या...