श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या
तळेगांव स्टेशन दि.28
आदरणीय सल्लागार मंडळ संचालक मंडळ निमंत्रित संचालक मंडळ दैनंदिन बचत प्रतिनिधी कर्मचारी वृंद यांना कळविण्यात येते की, आपल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पातसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल ईशा, खांडगे पेट्रोल पंपा जवळ, तळेगांव दाभाडे येथे होणार आहे.
या कार्यक्रमात आपले सर्वांचे श्रद्धास्थान सहकार नेते तथा पतसंस्थेचे संस्थापक माननीय बबनभाऊ भेगडे साहेब यांना सहकार क्षेत्रातील गेली ३० वर्षे हून अधिक भरीव योगदानाबद्दल/कार्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने कार्यक्रमात मान्यवर पाहुणे यांचे शुभ हस्ते"सहकार भूषण" कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ख्यातनाम साहित्यिक, जेष्ठ विचारवंत लेखक तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी, आदरणीय डॉ विश्वास पाटील सर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी आपणा सर्वांना मिळणार आहे.
तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास आपले सहकारी मित्र परिवार यांचे सह उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
Comments
Post a Comment