आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमान नगर मधील विद्यार्थी गिरवतायेत जर्मन भाषेचे धडे
आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमान नगर मधील विद्यार्थी गिरवतायेत जर्मन भाषेचे धडे
पुणे, विमाननगर दि.17 नोव्हें.2022.
आनंद विद्यानिकेतन हायस्कूल हे विमान नगर मधील विद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या नवनवीन उपक्रमामुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच विद्यालयामध्ये german language learning course सुरू करण्यात आलेला आहे या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याची नामी संधी उपलब्ध झालेली आहे.
श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेच्या कार्यवाह श्रीमती किरण तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,इनर व्हील क्लब ऑफ रिव्हर साईट पुणे व FLOA यांच्या संयुक्त विद्यमाने क्लबच्या अध्यक्षा श्रीमती माधवी चंदन मॅडम यांच्या पुढाकारातून प्रशालेमध्ये हा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे.
या कोर्स साठी जवळपास100 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ या कोर्सचे समन्वयक संतोष थोरात यांच्या माध्यमातून FLOA या संस्थेचे समन्वयक श्री शैलेश लेले यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या कोर्ससाठी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च सध्या बाजारामध्ये लागतो परंतु वरील संस्थेच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फी भरण्यात आलेली आहे. शालेय शिक्षणाबरोबरच एक आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्याचा आनंद विद्यार्थी व पालकांच्या मध्ये दिसून येत आहे.
येत्या 4 डिसेंबर रोजी या कोर्सची ऑनलाईन परीक्षा होणार आहे . लेवल फर्स्ट चा अभ्यासक्रम जवळपास शिककून पूर्ण झालेला आहे आता विद्यार्थी केवळ परीक्षेची वाट पाहत आहेत .
Comments
Post a Comment