श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेचा दिंडी सोहळा संपन्न
श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेचा दिंडी सोहळा संपन्न
तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ. संदीप गाडेकर) दि. 22 मावळ विकास मंडळ संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण (आजिवली) या शाळेचा कार्तिक एकादशीनिमित्त दिंडी सोहळा अतिशय उत्साहाने पार पडला. पालखीचे पूजन संस्थापक संचालिका स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ.बाळसराफ यांनी दिंडीचा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पारमार्थिक भावना वाढीस लागत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांमध्ये उच्च-नीचता हा भेदभाव जाऊन सर्व समान असल्याची भावना वाढीस लागते असे सांगून भारतीय संस्कृतीचा अभिमान मुलांच्या मनामध्ये विकसित होऊन संस्कारांची पाळेमुळे अधिक घट्ट होतात त्यामुळे आध्यात्मिक दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास चालना मिळते, अशी भावना व्यक्त केली.
शाळेपासून निघालेली दिंडी वाघेश्वर गावाकडे जाताना दिंडी सोहळ्यातील विद्यार्थ्यांमध्ये विठ्ठल रुक्मिणी संत देखावा वारकरी यांचे प्रतीकात्मक दर्शन घडले व सर्व वातावरण विठ्ठलमय झाले होते. विद्यार्थ्यांनी भजन गौळण, अभंग इत्यादी माध्यमातून खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, तर डोक्यावर तुळशी वृंदावन आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी दिंडीला मोठा प्रतिसाद दिला. यावेळी अतिदुर्गम भागातील कातकरी व आदिवासी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मोठा सहभाग हे या वर्षाच्या दिंडीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. दिंडीचे स्वागत वाघेश्वर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले. याप्रसंगी श्री. शहाजी कडू, श्री. प्रवीण कडू, श्री कैलास सावंत, श्री वाघू परडे, श्री. मधुकर कडू, सौ वैशाली कडू, सुजाता सावंत, व सविता शिंदे इत्यादी ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यां सोबत सहभोजनाचा आनंद घेतला. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सौ. वर्षा बारबोले, श्री मनोज क्षीरसागर, रामराजे भिलारे, श्री. अशोक कराड श्री. लहू घाटे, श्री संजय गायकवाड, श्री तानाजी काळे श्री बबन शेलार, श्री गुरुदास घारे या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अरगडे सरांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी देशपांडे यांनी केले व आभार श्री मनोज क्षीरसागर यांनी मांडले. अशा रीतीने हा दिंडी सोहळा संपन्न झाला.
Comments
Post a Comment