आई-वडिलांमुळे आपण आहोत, त्यामुळे बायकोचे थोडेसेच आणि आई वडिलांचे जास्त ऐका; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

 


तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदिप गाडेकर) आई-वडिलांमुळे आपण आहोत, त्यामुळे बायकोचे थोडेसेच आणि आई वडिलांचे जास्त ऐका; असा मार्मिक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (दि. २२) पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे केंद्रीय राखीव पोलीस दल आयोजित रोजगार मेळाव्यात दिला.

तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ केंद्र येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते, केंद्र सरकारच्या विविध विभागात/संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या २१३ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा 'रोजगार मेळावा' सुरु केला - आठवले

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की, आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. “देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रोजगार मेळावा सुरु केला आहे. या आधी, ऑक्टोबरमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात, ७५ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.” नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला आठवले यांनी दिला.

या कार्यक्रम प्रसंगी वित्त मंत्रालयाचे महाप्रबंधक विजयकुमार एन. कांबळे, पोस्ट मास्टर जनरल आर. के. जायभाये, रक्षा मंत्रालयाचे उप महाप्रबंधक प्रदीप महाडेश्वर, मिलिंद लाटकर, दर्शनलाल गोला, धीरज कुमार, सीआरपीएफ पुणे ग्रुप सेंटरचे प्रमुख डीआयजीपी राकेश कुमार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना न्याय देण्याचे कार्य होत आहे - रामदास आठवले

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे आत्तापर्यंत ४७ कोटी लोकांनी बँक अकाउंट काढले आहे. ९ कोटी महिलांना गॅस देण्यात आला आहे. सर्वच काम एकदम होत नसतात. ते पूर्ण होण्यासाठी काही काळ लागतो. सर्वांना न्याय देण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. केंद्र शासनाच्या नोकर भरतीच्या बरोबर राज्य शासनाच्या वतीने देखील नोकर भरती होत आहे. याचा फायदा युवकांनी घ्यावा, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कमांडन्ट रमेशसिंह बिष्ट यांनी केले. तर आभार कमांडन्ट कविंद्रकुमार चंद यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश