अड.पू. वा.परांजपे विद्यामंदिरात मराठी तसेच हिंदी या विषयांची पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
ऍड.पू. वा.परांजपे विद्यामंदिरात मराठी तसेच हिंदी या विषयांची पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
तळेगांव स्टेशन (संपादक-संदीप गाडेकर) दि ९ नोव्हेंबर रोजी अड.पू. वा.परांजपे विद्यामंदिरात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व न्यू समर्थ स्मार्ट स्कूलिंग तर्फे मराठी तसेच हिंदी या विषयांची कार्यशाळा बुधवार दिनांक नऊ ते रविवार दिनांक 13 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आज नू.म.वि. प्र.मंडळाचे सचिव माननीय श्री.संतोषजी खांडगे साहेब, न्यू समर्थ स्मार्ट स्कूलचे कार्यकारी संचालक श्री संजय देशमुख सर व श्री सुरेश पांडे सर ,प्रगती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री सुदाम वाळूंज सर ,समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री संजय वंजारे सर , परांजपे विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पोटे सर तसेच सर्व शाळांमधील मराठी विषयाचे अध्यापक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत श्रीपांडुरंग पोटे सरांनी केलं तर आलेल्या पाहुण्यांसाठी आरोग्यवर्धक तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. सुरेश पांडे सर तसेच श्री.संजय देशमुख सरांनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. शिक्षकांनी आजच्या युगाला धरून ज्ञान वाढवणे गरजेचे आहे याविषयी सांगितले.
नू.म.वि.प्र. मंडळाचे सचिवश्री.संतोष खांडगे साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कै.शलाका संतोष खांडगे ट्रस्ट तर्फे समर्थ- शलाका स्पर्धा परीक्षा याविषयी माहिती सांगितली. तसेच आजच्या काळात शिक्षकाने आपले ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्नशील असावे हे सांगितलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनिता नागपूरे मॅडम व दीप्ती बारमुख यांनी केले. तर आभार प्रगती विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. सुदाम वाळुंज सर यांनी मानले.
Comments
Post a Comment