विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा



तळेगांव दाभाडे (संपादक -डॉ.संदीप गाडेकर) विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन 3 डिसेंबर 2022 रोजी व्ही.पी.एस. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक यांनी एकत्र येत  या शैक्षणिक उत्सवात सहभाग घेतला.



संस्थेला  100 वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दीमहोत्सवी वर्षाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. गो.व्यं.शिंगरे, सचिव डॉ.स.बी.गवळी तसेच अभियांत्रिकी विभागाचे  प्राचार्य  डॉ. मानव आ.ठाकुर हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास श्रीमती निशा नाईक या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. तसेच अभियांत्रिकी शाखेचे तीनही विभागप्रमुख, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश