इंद्रायणी महाविद्यालयात भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे व 8 एकर भव्य क्रीडामैदानाचे उद्घाटन
इंद्रायणी महाविद्यालयात भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा व 8 एकर भव्य क्रीडामैदानाचे उद्घाटन
तळेगांव स्टेशन (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि.4 शिक्षकांनी विद्यार्थी घडवताना खडतर परिश्रम, खेळाची शास्त्रशुद्ध माहिती आणि सचोटी या त्रिसूत्रीवर भर द्यावा. त्यातून अनेक क्रीडापटू नावारूपाला येतील. मावळच्या क्रीडा समृद्धतेत निश्चित भर पडेल. क्रीडा छंदाला उपजिविकेचे माध्यम बनविले तर चरितार्थाच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. त्यासोबत उत्तम आरोग्य व जगण्याचे समाधानही प्राप्त होईल, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या आठ एकरवरील भव्य क्रीडांगणाचे उद्घाटन आज रविवार (दि ४) रोजी संपन्न झाले. तसेच 17 व 19 वर्षा खालील मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये भाग घेण्यासाठी मावळ तालुक्यातून विविध शाळांमधून संघ उपस्थित होते.
यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त विलास काळोखे, संदीप काकडे, संजय साने, युवराज काकडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, प्राचार्य डॉ संभाजी मलघे,उपप्राचार्य अशोक जाधव, डी फार्मसीचे प्राचार्य जी.एस. शिंदे, मावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी आदीजण उपस्थित होते.
Comments
Post a Comment