प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
तळेगांव स्टेशन (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि. 14 व्ही.पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज लोणावळा येथे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी फ्रेशर पार्टीचे आयोजन दिनांक १० डिसेंबर २०२२ सेरेनिटी रिसॉर्ट लोणावळा मध्ये करण्यात आले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करत असताना संस्थेकडून व महाविद्यालयाकडून काय अपेक्षा आहे याबाबत मनोगत व्यक्त केले.
तिसऱ्या व अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुण सादर केले प्राचार्य डॉक्टर मानव अ. ठाकूर यांनी भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते महाविद्यालयातील अध्ययन - अध्यापन प्रक्रिया विद्यार्थ्यांनी विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कला गुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयांमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment