आनंद विद्यानिकेतन हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात संपन्न
आनंद विद्यानिकेतन हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात संपन्न
पुणे, विमाननगर 16 डिसेंबर 2022
आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमाननगर या प्रशालेमध्ये 16 ते 22 डिसेंबर या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताहाचा आज मान्यवरांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेचे संस्थापक कार्यवाहक कै.बाबुरावजी तावरे यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर मुख्य क्रीडांगणावर ज्योतीचे आगमन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये क्रीडा ज्योतीचे स्वागत करून क्रीडा कुलांनी संचलन केले. यानंतर सरस्वती प्रतिमा व क्रीडा साहित्याचे पूजन संस्थेच्या कार्यवाह श्रीमती किरण तावरे मॅडम,लायन्स क्लब ऑफ पुणे गणेश खिंडचे चेअरमन राजीव अग्रवाल यांच्या हस्ते व प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ, संत गोरोबा बाल विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक सतीश पाटील, गुरुकुलच्या प्राचार्य डॉ.प्रीती मानेकर इतर मान्यवर व सर्व शिक्षकांच्या उपस्थित करण्यात आले.
प्रशालेच्या वतीने सर्व मान्यवरांचा विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन तसेच शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे गणेश खिंड यांच्यावतीने प्रशालेस जवळपास 25 हजार रुपये किमतीचे क्रीडा साहित्य भेट देण्यात आले याचा स्वीकार संस्थेच्या कार्यवाह श्रीमती किरण तावरे, प्रशालेचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण मासाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीमती किरण तावरे यांनी आपल्या मनोगत मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ हा अविभाज्य भाग असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास खेळाच्या माध्यमातून होत असतो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या खेळांमध्ये नैपुन्य मिळवलं पाहिजे तसंच आपल्या शाळेचा संस्थेचा नावलौकिक वाढवला पाहिजे असे आवाहन केले. तसेच प्रमुखातिथी राजीवजी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातमधून अधिकृतपणे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आले असे जाहीर करताना खेळ हा खिलाडू वृत्तीने खेळला पाहिजे तसेच खेळ व आरोग्य, आहार यांचे महत्त्व विशद करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व विद्यार्थी खेळाडूंना सर्व स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी क्रीडा शपथ देण्यात आली.
प्रत्यक्ष मैदानावर सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता नववी व दहावीच्या कबड्डीच्या मॅचचे टॉस उडवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांनाही कबड्डी खेळण्याचा मोह आवरला नाही त्यांनी विद्यार्थ्यांच्या बरोबर कबड्डी खेळाचा आनंद लुटला. यावेळी अन्वर मोमीन यांनी या कबड्डी सामन्यांचे सुंदर असे धावते वर्णन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख संतोष थोरात यांनी केले तर आभार उपक्रिडा विभाग प्रमुख सौ. पुनम पवार यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ क्रीडा विभाग प्रमुख संतोष थोरात तसेच सौ.पूनम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी लायन्स क्लबचे राजेश टेकरीवाल, गोपाल कृष्ण अग्रवाल, महेंद्र गादिया, हिरा अग्रवाल प्रशालेतील सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. संत गोरोबा बाल विद्यानिकेतनचे सर्व सहकारी शिक्षक , विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment