प्रतीक विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
प्रतीक विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
निगडे, मावळ: (संपादक- डॉ.संदीप गाडेकर) दि. 23 मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, प्रतीक विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज निगडे या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी, मान्यवर समारंभाचे अध्यक्ष मा. श्री यादवेंद्रजी खळदे साहेब (सचिव मावळ शिक्षण प्रतिष्ठान), संस्थेचे सहसचिव मा.श्री. प्राध्यापक वसंत पवार सर,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री महेश फडके साहेब (व्हॉइस प्रेसिडेंट,प्लांट हेड,एल. अँड. टी. डिफेन्स. तळेगाव पुणे). रांगोळी प्रदर्शन उद्घाटक मा. श्री गोपाळजी शिंदे साहेब (असिस्टंट जनरल मॅनेजर, इन्चार्ज तळेगाव पुणे). हस्तलिखित विमोचक मा. श्री सोनबा गोपाळे गुरुजी (सदस्य नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ)विविध गुणदर्शन उद्घाटक मा. श्री भिकाजी भागवत(विद्यमान सरपंच,निगडे) इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील विद्यार्थिनींनी औक्षण करून केले.अक्षरदीप हस्तलिखित प्रकाशन, विज्ञान प्रदर्शन ,रांगोळी प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे उद्घाटन प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले. त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती माता प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीतातून केले. प्रमुख अतिथी मान्यवरांचा विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वसंत पवार सर (सहसचिव मावळ शिक्षण प्रतिष्ठान) यांनी केले. विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी संस्था सर्वतोपरी प्रयत्न करेल,संस्थेची यशस्वी वाटचाल अशीच चालू राहील. त्यासाठी संस्था स्तरावर लागणारे योगदान नेहमीच संस्थाचालकांचे असेल असे मत आपल्या प्रास्ताविक मनोगतातून सादर केले. यानंतर निगडे गावचे नवनिर्वाचित सरपंच मा. श्री भिकाजी भागवत यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे आभार मानत संस्थेचे निगडे गावासाठी खूप मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले तसेच ग्रामपंचायत च्या माध्यमातून येणाऱ्या भावी काळात जी काही मदत लागेल ती नक्कीच सोडवण्यासाठी आम्ही निगडे ग्रामस्थ नक्कीच कटीबद्ध राहू असे आश्वासन दिले. अक्षरदीप या हस्तलिखिताचे विमोचक मा. श्री. सोनबा गोपाळे गुरुजी(सदस्य नूतन विद्या प्रसारक मंडळ) यांनी विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करून एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी. यासारख्या स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष द्यावे व आपल्याबरोबर तालुका व जिल्ह्याचे सुद्धा नावलौकिक वाढविण्याचे संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर श्री महेश फडके साहेब यांनी शालेय विद्यार्थी हे उद्याचे भवितव्य असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकांनी अधिक परिश्रम घेऊन एक सृजनशील पिढी घडविण्याचे आव्हान स्वीकारावे हे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. संस्था पदाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री यादवेंद्रजी खळदे साहेब (सचिव मावळ शिक्षण प्रतिष्ठान) यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये तसेच विशेष करून मुलींनी चूल आणि मूल एवढेच न पाहता उच्च शिक्षण घ्यावं. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे येणाऱ्या काळात येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सर्व अर्थाने तो विकसित व सक्षम झाला पाहिजे.यासाठी पुढील काळात निगडे गावात सिनिअर कॉलेजची सोय करण्याचा मानस संस्थेचा असेल व त्या दृष्टिकोनातून मावळ शिक्षण प्रतिष्ठान नेहमीच तत्पर राहील. असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. अध्यक्ष मनोगतानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम हा दोन सत्रांत पार पडला सकाळच्या सत्रात पारितोषिक वितरण व दुपारच्या सत्रात विविध गुणदर्शन अशाप्रकारे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम व विविध गुणदर्शन यामध्ये गणराया पासून छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील संस्कृती विविध प्रांत, भाषा, नृत्य अविष्कार नृत्यकला इ. संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांच्या नृत्यातून घडविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण उत्कृष्ट होण्यासाठी विद्यार्थी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री उत्तम मांडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शशिकांत कोळेकर सर, विद्यालयातील शिक्षक श्री सुनील मंडलिक सर व श्री चंद्रकांत मुरुमकर सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद इत्यादींनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमासाठी संस्थाचालकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा. श्री यादवेंद्रजी खळदे साहेब,संस्थेचे सहसचिव प्रा.मा. श्री.वसंत पवार सर, मा.श्री उत्तम मांडे सर (मुख्याध्यापक प्रतिक विद्यानिकेतन निगडे) मा.श्री शेवकर सर(मुख्याध्यापक पद्मावती विद्यामंदिर उर्से). मा. शिंदे मॅडम (आय.बी.टी. प्रमुख) मा. श्री.भिकाजी भागवत(नवनिर्वाचित सरपंच निगडे), श्री बबुशा भांगरे (माजी सरपंच निगडे) श्री देविदास भांगरे (माजी उपसरपंच निगडे), श्री शंकरराव आंभोरे (पोलीस पाटील. आंबळे) श्री भरत आंभोरे(व्हाईस चेअरमन विविध कार्यकारी विकास सोसायटी) श्री शांताराम शेजवळ, श्री अंकुश वहिले,
श्री धोंडीबा भागवत (माजी ग्रामपंचायत सदस्य), मंगल ताई भागवत (ग्रामपंचायत सदस्या) राजश्री खेंगले, मनीषा लोटे, रोशनी साळवे, संदीप चव्हाण राजू खेंगले इत्यादी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य.
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शशिकांत कोळेकर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उत्तम मांडे सर यांनी मानले.
Comments
Post a Comment