राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम-उद्योजक रामदास काकडे यांचे गौरवोद्गार
राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम-उद्योजक रामदास काकडे यांचे गौरवोद्गार
तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि.26 प्रगतीच्या नव्या स्वरूपाचा पाया म्हणजे आजची तरूणाई आहे. त्यामुळे या तरूणाईचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे. या जोरावर राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम ठरेल. असे गौरवोद्गार इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांनी काढले. नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयाच्या क्रीडा महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात काकडे बोलत होते. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रंथालय स्वखर्चाने बांधून देण्याची घोषणा काकडे यांनी केली.
जग आज जलदगती प्रवासाने प्रगतीच्या नव्या आविष्कारांकडे झेपावते आहे. प्रगतीच्या या नव्या स्वरूपाचा पाया म्हणजे आजची तरूणाई आहे. या तरूणाईचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे, या जोरावर आजची ही नव शिक्षित तरूणाई आपल्या प्रदेशाला पर्यायाने राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यास सक्षम ठरेल म्हणूनच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीराम विद्यालयाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवता येणे शक्य आहे असे गौरवोद्गार काकडे यांनी काढले.
यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त विलास काळोखे, संजय साने, संदीप काकडे, इंद्रायणी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवराज काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे,विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपत कायगुडे, पीएमआरडीएचे रविंद्र देसाई,माजी सभापती निवृत्ती शेटे, प्रविण जाधव, शालेय समिती अध्यक्ष सुरेश शेटे, जालिंदर शेटे, संतोष नरवडे, नवनाथ तानाजी पडवळ,उपसरपंच राहुल शेटे, संतोष पापळ, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, नव्या जगाची ओळख होण्यासाठी नवीन शैक्षणिक जाणीवा समृध्द होणे गरजेचे आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तुकड्या तुकड्यात विभागली गेलेली शेती आणि यात भरडला जाणारा शेतकरी याला पर्याय म्हणून प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर मानवाने पर्यायाने समाजाने आपली प्रगती साधावी.बागायती जमीनीपेक्षाही उच्च शिक्षित तरूण ही मोठी संपत्ती असल्याचे मत काकडे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यालयासाठीचे ग्रंथालय स्वखर्चाने बांधून देण्याची घोषणाही काकडे यांनी केली.
यावेळी बोलताना संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी पटसंख्या वाढीची अपेक्षा व्यक्त करत विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी पदाधिकारी,शिक्षक व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश शेटे, संतोष नरवडे, रविंद्र देसाई आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपत कायगुडे यांनी केले तर सूत्रसंचालन युवराज सोनकांबळे व जयश्री कुलकर्णी यांनी केले.
Comments
Post a Comment